• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Faf Du Plessis : फाफ डु प्लेसीस गौतम गंभीरला खलनायक म्हणाला, कारण काय?

March 26, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर स्वभावाने बऱ्यापैकी गंभीर आहेत. कायम गंभीर भावमुद्रा असणाऱ्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकांना दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीस याने व्हीलन असं म्हटलंय. मात्र फाफने गंभीरला कौतुकाने व्हीलन म्हटलंय. “माझा गंभीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा त्या खेळाडूंपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे जे त्याच्यासोबत खेळले आहेत, असं फाफ जिओस्टारच्या आयपीएल टुडे हॉट टेक्समध्ये म्हणाला. त्याच्या विरुद्ध खेळताना कायम त्यालाच खलनायक मानलं जातं, असंही फाफने म्हटलं. (Photo Credit: PTI)

Faf Du Plessis and Gautam Gambhir

फाफने गंभीरचं कौतुक केलं. तसेच फाफने गंभीर कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचं म्हटलं. आपण कुणाला आवडतो की नाही याची गंभीरने कधीच पर्वा केली नाही”, असं फाफने म्हटलं. “तुम्ही कर्णधार किंवा त्याच्या विरुद्ध खेळणारे खेळाडू असाल तर निश्चित तुमचा पराभूत करण्याचा प्रयत्न असेल, कारण विरोधी टीम म्हणून त्यांची खेळण्याची पद्धतच तशी आहे”, असं फाफने म्हटलं. (Photo Credit: PTI)

Team India Gautam Gambhir

गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला एका मजबूत संघात बदललं”, असं फाफने म्हटलं. तसेच गंभीर एक मापदंड निश्चित करतो. तसेच तुम्ही तुमच्या टार्गेटपासून भरकटलात, तर तो तुम्हाला धडा शिकवणार”, असंही फाफने म्हटलं. (Photo Credit: PTI)

Delhi Capitals Faf Du Plessis

आश्चर्याची बाब म्हणजे गंभीरबाबत इतकं काही बोललेला फाफ त्याच्यासोबत कधीच खेळला नाही. मात्र त्यानतंरही फाफ गंभीरला एक चिवट प्रतिस्पर्धी समजतो. तसेच फाफने गंभीरच्या विजयासाठी असलेल्या समर्पणाचं कौतुक केलं. (Photo Credit: PTI)

Gautam Gambhir Team India

खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकेत गंभीरची निष्ठा ही विजयी संघ घडवण्यात अत्यंत महत्त्वाची राहिल्याचं फाफने म्हटलं. फाफनुसार, गंभीर स्तुती मागे धावत नाही. गंभीर स्तुतीऐवजी शिस्त आणि जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रीत करतो, असंही फाफने म्हटलंय. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in