
दिल्लीवरुन देहरादूनला पोहोचणं आता अजून सोप होईल. कारण पीएम मोदी येत्या 14 एप्रिलला दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवे चं उद्घाटन करणार आहेत. या मार्गाने आता देहरादूनला फक्त अडीचतासात पोहोचता येईल. या एक्सप्रेस वे मुळे तुम्ही कुठल्या हिल स्टेशन्सवर लवकर पोहोचाल ते जाणून घ्या.
दिल्लीवरुन आधी देहरादूनला जाण्यासाठी जवळपास 6 तास लागायचे. पण आता हा वेळ कमी होऊन अर्धा होणार आहे. याचं कारण आहे दिल्ली-देहारादून एक्सप्रेस वे. दिल्लीत राहणार्या लोकांच्या शॉर्ट ट्रिपसाठी देहारादून आता एक चांगलं हिल स्टेशन बनणार आहे. हे एक फेमस पर्यटन स्थळ आहे.
मसुरीला पोहोचण्यासाठी आधी 8 तास लागायचे. पण आता ही वेळ कमी होऊन 4 तास होईल. मसूरीला लास्ट मिनिट ट्रिप डेस्टिनेशन सुद्धा म्हणतात. कारण इथे पोहोचणं सोप आहे. मसुरीचा मॉल रोड फिरण्याची एक वेगळीच मजा आहे.
दिल्लीवरुन कनाताल जाणं सुद्धा बेस्ट आहे. कारण मसुरीत थोडी गर्दी मिळते. कनाताल मध्ये कॅम्पिंग साइट्स आहेत. डोंगर रांगांची शांतता मनाचा तणाव लगेच दूर करते. कनातालच वैशिष्ट्य हे आहे की, याला उत्तराखंडमधील लपलेली जागा बोलतात.
उत्तराखंडमधील पर्यटन स्थळ हिडन जेम आहेत. लष्कराच्या उपस्थितीमुळे हा छावणीवाला एरिया आहे. पण इथे ओढे आणि गुफा तुम्हाला प्रेमात पाडतात. चकराता येथे गेल्यानंतर मनाला एक शांती मिळते. देहरादूनवरुन येथे पोहोचणं सोपं आहे.




Leave a Reply