
पाकिस्तानचा अनुभवी आणि प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शाहीनने सुपर 8 फेरीतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. हॅरी ब्रूक याने चाबूक शतक करत इंग्लंडला जिंकवल्याने शाहीनच्या या वर्ल्ड रेकॉर्डची चर्चा फार झाली नाही. मात्र शाहीनने काही वेळ इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. शाहिन या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. शाहीनने या 4 पैकी 3 विकेट्स पावरप्लेमध्ये घेण्याची कामगिरी केली. शाहीनने यासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली.
साहिबजादा फरहान याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने हे आव्हान कॅप्टन हॅरी ब्रूक याच्या शतकाच्या जोरावर 19.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शाहीनने या 8 पैकी 4 विकेट्स एकट्याने घेतल्या. शाहीनने पावरप्लेमध्ये 3 विकेट्स घेऊन कोणता वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला हे जाणून घेऊयात.
शाहिनने पावरप्लेमध्ये घेतलेल्या या 3 विकेट्समुळे 165 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची नाजूक स्थिती झाली होती. मात्र हॅरी ब्रूक याने शतक करुन इंग्लंडला जिंकवलं. ब्रूकच्या शतकामुळे इंग्लंडने सुपर 8 फेरीतील सलग दुसरा सामना जिंकला. पाकिस्तान विजयी होण्यात अपयशी ठरली.
शाहीनकडून इंग्लंडला पावरप्लेमध्ये 3 झटके
शाहीनने इंग्लंडला त्यांच्या डावातील पहिल्याच बॉलवर पहिला झटका दिला. शाहीनने इंग्लंड टीमच्या फिलीप सॉल्ट याला आऊट केलं. शाहीनने यासह टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर सर्वाधिक विकेट घेण्याचा स्वत:चाच विक्रम आणखी मजबूत केला. तसेच शाहीन टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पावरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे.
शाहीनने पावरप्ले दरम्यान त्याच्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये जोस बटलर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शाहीनने कोट्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये जेकब बेथल याला आऊट केलं. शाहीनने अशाप्रकारे 13 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या.
वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
शाहीनने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कगिसो रबाडा याचा विक्रम मोडीत काढला. ताज्या आकडेवारीनुसार, शाहीनच्या नावावर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 18 विकेट्स झाल्या आहेत. तर कगिसो रबाडा याच्या नावावर या स्पर्धेत 16 विकेट्सची नोंद आहे.
Leave a Reply