• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NZ, Super 8 Live Streaming : इंग्लंड-न्यूझीलंड आमनेसामने, किवी सेमी फायनलमध्ये पोहचणार?

February 27, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा आता रंगतदार स्थितीत आली आहे. सध्या या स्पर्धेत सुपर 8 फेरीचा थरार पाहयाला मिळतोय. इंग्लंडने सुपर 8 फेरीत सलग 2 सामने जिंकून सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यानंतर टीम इंडियाने गुरुवारी 26 फेब्रुवारीला झिंबाब्वेवर 72 धावांनी मात करत सुपर 8 फेरीतील पहिला विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. तर भारताच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिका ए ग्रुपमधील सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली तर एकूण दुसरी टीम ठरली आहे. आता शुक्रवारी सुपर 8 फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत.

न्यूझीलंडसाठी विजय महत्त्वाचा

इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र इंग्लंडचा हा सामना जिंकून सुपर 8 फेरीत नंबर 1 राहण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. अशात न्यूझीलंड या सामन्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे.  हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.  या निमित्ताने इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 फेरीतील सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना शुक्रवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे बघायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in