• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NZ Super 8 : न्यूझीलंडचं मिशन सेमी फायनल, इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाकिस्तानचा पत्ता कट करणार?

February 27, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीम शुक्रवारी 27 फेब्रुवारीला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडसमोर या सामन्यात इंग्लंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. इंग्लंड सर्वात आधी उपांत्य फेरीत पोहचली आहे. तर न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालावर पाकिस्तानचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या एका सामन्याचा निकाल 3 संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

न्यूझीलंड इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज

न्यूझीलंड गुरुवारी सुपर 8 फेरीत इंग्लंडवर विजय मिळवून सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडने त्यासाठी जोरदार सरावही केला आहे. न्यूझीलंडचा सुपर 8 मधील पाकिस्तान विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे न्यूझीलंड आणि पाकिस्तानला प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. न्यूझीलंडने त्यानंतर सेमी फायनलच्या हिशोबाने करो या मरो सामन्यात यजमान श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. तर इंग्लंड पहिले 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहचली आहे. मात्र बी ग्रुपमधून टेबल टॉपर टीम ठरली नाहीय. त्यामुळे इंग्लंडसाठी बी ग्रुपमधून टेबल टॉपरच्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय

न्यूझीलंडने सुपर 8 मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 61 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत करत सुपर 8 फेरीतील विजयाचं खातं उघडलं. न्यूझीलंडला मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये चांगला फायदा झाला. ताज्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +3.050 असा आहे. त्यामुळे न्यूझीलंडला आता इंग्लंड विरुद्ध मोठ्या फरकाने पराभूत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

पाकिस्तानचं सेमी फायनलचं समीकरण

पाकिस्तानला सुपर 8 फेरीत इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं. इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट -0.461 असा झाला. मात्र पाकिस्तानला आताही उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर न्यूझीलंडचा पराभव होणं गरजेचं आहे. तसेच पाकिस्तानला श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यामुळे पाकिस्तानचं समीकरणं हे फार जर तरचं आहे. त्यामुळे आता इंग्लंड विजयी हॅट्रिक करणार की न्यूझीलंड विजयासह उपांत्य फेरीत पोहचून पाकिस्तानचं पॅकअप करण्यात योगदान देणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in