
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत 27 फेब्रुवारीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. इंग्लंडने या फेरीतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर न्यूझीलंड पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. आता दोन्ही संघ कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आमनेसामने आहेत. न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडने या सामन्यात इंग्लंडसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अशात आता न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार? हे जाणून घेऊयात.
Leave a Reply