• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NZ : इंग्लंडचा विजय, न्यूझीलंडला टेन्शन, पाकिस्तानला दिलासा, सेमी फायनलची चुरस कायम?

February 28, 2026 by admin Leave a Comment

युवा फलंदाज रेहान अहमद आणि विल जॅक्स या जोडीने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी हॅट्रिक पूर्ण केली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमने इंग्लंडला विजयासाठी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 160 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 4 विकेट्स राखून 3 बॉलआधी पूर्ण केलं. इंग्लंडने 19.3 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या. तर न्यूझीलंडने या पराभवासह उपांत्य फेरीत सुरक्षितपणे पोहचण्याची मोठी संधी गमावली. न्यूझीलंडच्या पराभवामुळे आता पाकिस्तानचीही सेमी फायनलसाठी शक्यता वाढली आहे.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडने टॉस जिंकून 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 159 रन्स केल्या. न्यूझीलंडसाठी टीम सायफर्ट याने 35 तर ग्लेन फिलिप्स याने 39 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही हातभार लावला. त्यामुळे इंग्लंडसमोर 160 रन्सचं टार्गेट ठेवता आलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यानंतर अप्रतिम सुरुवात केली. न्यूझीलंडने पहिल्या 2 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. फिलिप सॉल्ट याने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर जोस बटलर याला भोपळाही फोडता आला नाही.

इंग्लंडची फ्लॉप सुरुवात

सलामी जोडी फ्ल़ॉप ठरल्यानंतर इंग्लंडच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा करत सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. मात्र न्यूझीलंडनेही विकेट घेऊन इंग्लंडला आपल्यावर वरचढ होऊन दिलं नाही. कॅप्टन हॅरी ब्रूक याने 26, जेकब बेथल याने 21, सॅम करन याने 24 तर टॉम बँटन याने 33 धावांचं योगदान दिलं. टॉम आऊट झाल्याने इंग्लंडचा स्कोअर 16.5 ओव्हरमध्ये 6 आऊट 117 असा झाला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 19 बॉलमध्ये 43 रन्सची गरज होती.

रेहान अहमद आणि विल जॅक्स या जोडीने 3 बॉलआधीच या धावा पूर्ण करुन इंग्लंडला विजयी केलं. रेहान-जॅक्स या जोडीने फटकेबाजी करुन गेम फिरवला. दोघांनी सातव्या विकेटसाठी फक्त 16 बॉलमध्ये नॉट आऊट 44 रन्सची पार्टनरशीप केली आणि इंग्लंडला विजयी केलं. विलने 18 बॉलमध्ये नॉट आऊट 32 रन्स केल्या. तर रेहान अहमद याने नाबाद 19 धावांचं योदान दिलं. न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री, लॉकी फर्ग्यूसन आणि ग्लेन फिलीप्स या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र याचा काही फायदा झाला नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in