• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NEP : आम्ही इथे…, इंग्लंडला ठसवल्यांनतर नेपाळच्या कॅप्टनची रोखठोक प्रतिक्रिया, रोहित काय म्हणाला?

February 8, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेत मुख्य संघांसह नवखे संघही सहभागी झाले आहेत. नवख्या संघांच्या कामगिरीमुळे त्यांना लिंबुटिंबु म्हणून गृहित धरलं जातं. मात्र या स्पर्धेच्या सुरुवातीलाच तुलनेत नवख्या असणार्‍या संघांनी आपल्याला गृहित धरु नये, हे आपल्या कामगिरीतून दाखवून दिलंय. नेदरलँड्सने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला जेरीस आणलं होतं. यूएसएने गतविजेत्या टीम इंडियाला झुंजवलं. त्यानंतर आज 8 फेब्रुवारीला नेपाळने इंग्लंडला रडकुंडीला आणलं. इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध अवघ्या 4 धावांनी विजय झाला. नेपाळने 185 धावांचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. मात्र नेपाळचे प्रयत्न अवघ्या 4 धावांनी कमी पडले. नेपाळला 20 ओव्हरमध्ये 180 धावांपर्यंतच पोहचता आलं.

इंग्लंडने हा सामना जिंकून आपली लाज राखली आणि उलटफेर होण्यापासून स्वत:चा बचाव केला. इंग्लंड विरूद्धच्या या पराभवानंतर नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल याने त्याला आपल्या संघातील खेळाडूंचा अभिमान असल्याचं म्हटलं. तसेच रोहितने आपण इथे (स्पर्धेत) फक्त सहभागी व्हायला आलो नाहीत, असं म्हणत इतर संघांना बजावलंय. रोहितने काय भावना व्यक्त केल्या हे जाणून घेऊयात.

रोहितने काय म्हटलं?

“मला माझ्या संघाचा अभिमान आहे. मुलांनी (खेळाडूंनी) विजयासाठी स्वत:ला झोकून दिलं. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आलो तेव्हा आम्हाला विश्वास होता की आम्ही चांगली करु शकतो. आम्ही इथे फक्त सहभागी होण्यासाठी आलेलो नाहीत”, असं म्हणत रोहितने इतर संघांना सतर्क राहण्याचं इशारा दिला.

“आम्ही पूर्ण प्रयत्न केले”

“निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र आम्ही सर्व आघाड्यांवर 100 टक्के प्रयत्न केले. सॅम करन याने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली. आम्ही सामन्याचा शेवट विजयाने करण्यासाठी प्रयत्न करु”, असंही रोहितने नमूद केलं.

नेपाळचे टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उर्वरित सामने

दरम्यान नेपाळ या पराभवासह या मोहिमेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. नेपाळचा या स्पर्धेसाठी सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. नेपाळ आपल्या पुढील 3 सामन्यांत अनुक्रमे इटली, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड विरुद्ध भिडणार आहे. नेपाळला पुढील फेरीत पोहचण्यासाठी या 3 सामन्यांत विजय मिळवणं महत्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in