• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Earthquake: जम्मू-कश्मीर पासून ते दिल्ली, भूकंपाच्या हादऱ्याने लोक शहारले…

April 3, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे इराण युद्धामुळे जनता इंधनाच्या टंचाईत पिचली असताना राजधानी दिल्ली-एनसीआर, जम्मू-कश्मीर आणि चंदीगड येथे भूकंपाचे झटके जाणवल्याने लोक घाबरले. भूकंपाच्या झटक्याने जम्मू – कश्मीरातील अनेक जिल्ह्यांना हादरवले. एकापाठोपाठ आलेल्या दोन झटक्यांनी जम्मू-कश्मीरात लोक प्रचंड घाबरले. अशाच प्रकार दिल्ली-एनसीआर भागात जाणवला. नोएडाच्या अनेक कार्यालयातील कर्मचारी भूकंपाचा हादरा जाणवल्याने रस्त्यावर आले. निवासी भागातील घरातील छताचे पंखे हलू लागल्याने लोक घराबाहेर पळाले. आतापर्यंत तरी राजधानी दिल्लीसह अनेक भागात जाणवलेल्या या हादऱ्यांमुळे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

येथे पोस्ट पाहा –

#WATCH | Jammu & Kashmir: An earthquake was felt in Srinagar. Chandeliers and fans were seen moving. pic.twitter.com/iFx5OTZ7uB

— ANI (@ANI) April 3, 2026

 

अफगाणिस्तानमध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप

या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमा प्रदेशात होते. यामुळे अफगाणिस्तानात भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. दिल्ली- एनसीआरमध्ये आलेला हा तिसरा भूकंप आहे. याआधी जानेवारी महिन्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहिला भूकंपाचा धक्का १९ जानेवारी रोजी जाणवला होता. याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्र उत्तर दिल्लीत होता.

.दिल्ली कोणत्या भूकंप झोनमध्ये मोडते?

भारतीय मानक ब्युरोने भूकंपाची तीव्रता आणि धक्क्यांची वारंवरीतेच्या आधारावर देशाला चार भूकंपांच्या झोनमध्ये विभागले आहे. हे झोन म्हणजे झोन II, झोन III, झोन IV आणि झोन V. झोन II हा कमी जोखमीचा भूकंपीय झोन असून, त्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराज, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, कर्नाटकातील बंगळूर, बंगालमधील दुर्गापूर, छत्तीसगडमधील भिलाई, मध्य प्रदेशातील भोपाळ, आंध्र प्रदेशातील हैदराबाद आणि राजस्थानमधील जयपूर यांचा समावेश होतो. झोन IV हा उच्च जोखमीचा भूकंपीय झोन असून, येथे ६ ते ६.९ तीव्रतेचे भूकंप होतात. दिल्ली याच झोनमध्ये येते.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in