• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dubai: भयानक… दुबईत कुटुंबियांसोबत अडकलाय लोकप्रिय अभिनेता, हादरवणारा व्हिडीओ; म्हणाला, ‘आकाशात मिसाईल आणि…’

March 2, 2026 by admin Leave a Comment


Dubai: अमेरिका – इस्रायल या दोन देशांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ले केले. त्यानंतर इराणने देखील अमेरिकेच्या मुख्य सैन्या तळांना लक्ष्य केलं आणि मोठ्या प्रमाणात रॉकेट डागले… अमेरिका – इस्रायल आणि इराण देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे… दुबईत देखील हल्ल्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. तेथे आकाशात मिसाईल्स दिसत आहे. सांगायचं झालं तर, अनेक भारतीय दुबईत अडकलेले आहेत. प्रसिद्ध आणि लोकप्रिय साउथ अभिनेता विष्णू मांचू देखील कुटुंबियांसोबत दुबईत अडकलेला आहे… अभिनेत्याने दुबईतील परिस्थितीचा एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अभिनेत्याने सांगितलं दुबईत कसं आहे वातावरण

विष्णू याने मन विचलित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशातील मिसाईल्स स्पष्ट दिसत आहेत. हवेत होणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने अभिनेत्याचं घर हादरलं आहे. स्फोटांच्या आवाजामुळे अभिनेत्याची लहान मुलगी आयरा प्रचंड घाबरली आहे… अभिनेत्याला सध्या मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

 

In Dubai visiting family tonight. Missiles visible in the sky. The loud interceptions shook our home and frightened little Ayra.

Praying for peace. No child anywhere should grow up hearing the sound of war above their roof.

Grateful to the UAE defense forces for keeping… pic.twitter.com/tCbE78eoBY

— Vishnu Manchu (@iVishnuManchu) February 28, 2026

 

विष्णू याने X वर भयानक परिस्थितीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘दुबईत कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो आहे… आकाशात मिसाईल्स पाहायला मिळत आहेत. स्फोटांच्या आवाजामुळे आमचं घर देखील हादरत आहे… आणि माझी लहान मुलगी पूर्णपणे घाबरली आहे… आता फक्त शांतीसाठी प्रार्थना करत आहे…’

‘जगात कोणत्याच मुलाला आपल्या घरावर बॉम्बच्या हल्ल्यांचे आवाज ऐकत मोठं नाही व्हायला पाहिजे… आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची खात्री केल्याबद्दल मी यूएई संरक्षण दलांचा आभारी आहे. असे क्षण आपल्याला जीवन किती नाजूक आहे याची आठवण करून देतात. शक्ती आणि शांतीसाठी प्रार्थना. हर हर महादेव.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आणि अभिनेत्याला सुरक्षित राहण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित
  • KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ
  • घरात कापूर जाळताना विसरूनही करू नका या 5 चुका; होईल मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in