• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Divorce : मी या मतलबी स्त्रीला..एका मोठ्या राजकीय कुटुंबात होणार घटस्फोट, बायकोला थेट म्हटलं की…

January 19, 2026 by admin Leave a Comment


समाजवादी पार्टीचे सुप्रीमो अखिलेश यादव यांचा भाऊ प्रतीक यादव पत्नी अपर्णा यादवला घटस्फोट देणार आहे. मुलायम यांच्या कुटुंबातील सूनबाई अपर्णा यादव भाजप महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी समाजवादी पार्टीवर अनेकदा टीका केली आहे. प्रतीक यादव यांनी इन्स्टावर पोस्ट शेअर करुन अपर्णाला कुटुंब तोडणारं ठरवलं. “मी या मतलबी स्त्रीला लवकरात लवकर घटस्फोट देणार आहे. हिने माझ्या कुटुंबाची नाती बिघडवली आहेत. तिला फक्त प्रसिद्ध आणि प्रभावी बनायचं आहे. आता माझं मानसिक आरोग्य खराब आहे. तिला त्याचा काही फरक पडत नाही. कारण तिला स्वत:ची चिंता आहे. मी इतकी वाईट स्त्री कधी पाहिलेली नाही. दुर्देवाने माझं तिच्यासोबत लग्न झालं” असं प्रतिक यादवने सोशल मिडिया पोस्टवर लिहिलं आहे.

मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादवने समाजवादी पार्टी सोडून भाजपत प्रवेश केला. आता त्या भाजप महिला राज्य आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. अलीकडेच त्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी मुंबईत आल्या होत्या. अपर्णा यादव यांनी नेहमीच समाजवादी पार्टीवर टीका केली आहे. त्यामुळे यादव कुटुंबातीलच व्यक्ती पक्षाविरोधात आहे, असं विरोधक बोलतात. अपर्णाचा भाऊ अमन बिष्टने सांगितलं की, प्रतीकच अकाऊंट हॅक झालय आणि फोनही लागत नाहीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prateek Yadav (@iamprateekyadav)

फॅमिली विनाशक म्हटलं

पती प्रतीक यांनी जाहीरपणे अपर्णाला फॅमिली विनाशक म्हटलं आहे. अपर्णा यांनी यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चर्चांचा बाजार गरम आहे. मुलायम यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद बाहेर येतील असं टीकाकार म्हणत आहेत. प्रतीक यादव किंवा अपर्णा यादव यांच्या नातेवाईकांनी अजून घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. अपर्णाचा भाऊ अमन बिष्ट यांचं असं म्हणणं आहे की, हे सोशल मिडिया अकाऊंट हॅकचा प्रकार असू शकतो.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?
  • नव्या iPhone ची बंपर किंमत कपात, एका झटक्यात 25 हजारांनी किंमत घटली
  • महिला आणि पुरुषांनी शरीराच्या या भागावर काळा धागा बांधणे असते प्रचंड शुभ, 99 टक्के लोक…
  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in