• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Disha Vakani : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या दयाबेनवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन

April 8, 2026 by admin Leave a Comment


टीवी सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली दया अर्थात अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) सर्वांनाच माहीत आहे. मात्र सध्याचा काळ हा दिशा व कुटुंबियासाठी मोठा कठी आहे. दिशा वकीन हिच्य वडीलांचं निधन झालं. यामुळे दिशा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिशाचे वडील भीम वकानी हे ज्येष्ठ अभिनेते होते.

दिशा वकानीच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु अभिनेत्रीचे कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. अनेक चाहते या कठीण काळात दिशा वकानीच्या पाठीशी उभे आहेत.

कोण होते भीम वकानी ?

दिशा वकानी (Disha Vakani) चे वडील भीम वकानी हेही नामवंत अभिनेते होते. गुजराती थिएटरपासून कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या भीम वकानी यांनी तिथे दीर्घ काळ काम केलं, त्यानंतर ते बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांतही दिसले. आमिर खान च्या ‘लगान’ चित्रपटात त्यांनी काम केलं, त्यामध्ये त्यांची छोटीशी भूमिका होती. तसेच शाहरुख खान चा ‘स्वदेस’ आणि माधुरी दीक्षितच्या ‘लज्जा’ चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला होता.

तारक मेहता का उल्टा चश्मा का मध्येही दिसले होते दिशाचे वडील

एवढंच नव्हे तर भीम वकानी हे त्यांच्या लेकीच्या, दिशा वकानी हिच्या गाजलेल्या, ‘ तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतही झळकले होते. एपिसोड नंबर 1320 मध्ये ते दिसले होते. या भागत ते बाबूजी चंपकलाल यांचे मित्र, मावजी छेडा या भूमिकेत दिसले. बाघा चुकून मावजीला प्रेशर कुकरऐवजी 50 हजार रुपये रोख देतो आणि तो भिडेला पैशांऐवजी कुकर देतो, यामुळे मोठा गोंधळ झाला होता, असं या एपिसोडमध्ये दाखवलं होतं.

दिशा वकानी लाईमलाइटपासून दूर

एकेकाळी ‘ तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा अविभाज्य भाग असलेली अभिनेत्री दिशा वकानी सध्या अभिनयापासून दूर असून ती लाईमलाइटमध्येही नसते. सध्या ती तिचा संपूर्ण वेळ घर, कुटुंब, मुलांसोबत घालवत आहे. तिला दोन मुलं असून अनेकदा त्यांचेही फोटो व्हायरल झाले होते.

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
  • या देशात २० हजारात चहा आणि १ लाखात लंच, तरीही जगातला सर्वात स्वस्त देश, होते पर्यटकांची मोठी गर्दी
  • RR vs MI Score Updates and Highlights IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी नमवलं
  • Iran US War Update : जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज… अखेर इराण… रातोरात काय घडलं?
  • या 3 चित्रपटांना बॅन करण्याची मागणी, काहींनी तर फ्लॉप होण्यासाठी मागितलेली मन्नत, पण चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in