• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar The Revenge : सांगायचं तात्पर्य म्हणजे, तुम्हाला केवळ… पण हे सिनेमाचं परीक्षण नाही!

March 21, 2026 by admin Leave a Comment


पंकज कुमार (समीक्षक) : मी सिनेमाचं परीक्षण लिहित नाही आणि हे सिनेमाचं परीक्षणही नाहीये. फक्त काल रात्री ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा सिनेमा पाहिला आणि काही तरी लिहिलं पाहिजे असं मनापासून वाटू लागलं. लिहिलं यासाठी पाहिजे की, आपण जे पाहतो, ऐकतो आणि वाचतो त्याचा थेट समाजावर परिणाम होतो. याचा परिणाम इतका तगडा असतो की, काही देशात तर यामुळे सरकारं उलथवली गेली आहेत. असो. तत्त्वज्ञानावर नंतर बोलू. आता सिनेमाची कहाणी, पटकथा, अभिनय, संवाद आणि सिनेमाटोग्राफीवर येऊया.

आदित्य धरने एक दिग्दर्शक म्हणून आपलं बेस्ट

पहिल्या पार्टमध्ये दिलं होतं. त्यामुळेच सिनेमाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना काही देण्यासारखं त्यांच्याकडे नाहीच असं वाटतं. दुसऱ्या पार्टमध्ये तर पहिल्या पार्टलाच अनेक ठिकाणी रिपीट करण्यात आलंय. विषयाचा फॉरमॅट तोच आहे. गोष्ट सांगण्याची पद्धतीही तीच आहे. इतकंच नाही तर संगीतचा वापरही पहिल्या भागासारखाच केलाय. फक्त यावेळी सिनेमाची लांबी तेवढी मोठी आहे. पण सिनेमाची लांबी वाढली म्हणजे सिनेमा ग्रेट होतो असं काही नाही.

https://t.co/ntr03uuvjp

— Pankaj Kumar (@mainpankajkumar) March 19, 2026

एका वाक्यात धुरंधरच्या दुसऱ्या पार्टचं वर्णन करायचं म्हणजे सिनेमा बरा आहे. अर्थात सिनेमा फार वाईट आहे, असं नाही. पण तो पहिल्या पार्टच्या तुलनेत फार चांगलाही नाहीये. उत्सुकता वाढवणारा, नवं काही देणारा नाहीये. किंवा वेगळा धक्का देणारा नाही. आधीच्याच वळणाचा हा सिनेमा आहे. पहिला भाग हा अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेच्या आसपास रुळणारा होता. तर दुसरा पार्ट हा रणवीर सिंहच्या व्यक्तिरेखेवर केंद्रीत झालेला आहे. जसकिरत सिंह रांगी ते हमजा अली मजारी बनण्यापर्यंतचा रणवीरचा प्रवास या भागात दाखवण्यात आलाय. पहिल्या पार्टमध्ये रणवीर सिंह अक्षय खन्नाच्या समोर पानीकम ठरला होता. मात्र, दुसऱ्या पार्टमध्ये त्याने ही कसर भरून काढली आहे. अर्थात दुसऱ्या पार्टमध्ये अक्षय खन्ना नाहीये हे महत्त्वाचं. जसकिरतचा इमोशनल सीन असो वा हमाजाचा खतरनाक अंदाज… रणवीर दोन्ही ठिकाणी छाप पाडून गेलाय.

रणवीर सिंह हा एक उत्कृष्ट आणि कसदार

अभिनेता आहे आणि त्याने दुसऱ्या पार्टमध्ये त्याचं बेस्ट दिलंय. अर्जुन रामपालने मेजर इकबालच्या रोलमध्ये चांगलं काम केलंय. त्याचा रणवीरसोबतचा फेस-ऑफ हा या सिनेमातील बेस्ट सीनपैकी एक आहे. आर. माधवन आणि राकेश बेदी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा चांगल्या वठवल्या आहेत. प्रत्येक सिनेमात करतो तसंच काम संजय दत्तने या सिनेमात केलंय. चांगलंही नाही आणि वाईटही नाही. सारा अर्जुनकडे करण्यासारखं खूप काही नव्हतं. त्यामुळे ती सिनेमात प्रभावी वाटली नाही. पण तिचा स्क्रीन प्रेझेंस चांगला आहे.

धुरंधरच्या पहिल्या भागात सिनेमाटोग्राफी अत्यंत दमदार होती. दुसऱ्या पार्टमध्ये नवीन काही असं बघायला मिळत नाही. दुसऱ्या भागातील कॅमेरा, एडिटिंग, संगीत या सर्व गोष्टी पहिल्या पार्टमधूनच उचलल्या सारख्या वाटतात. एकमात्र खरं की एडिटिंग अत्यंत वेगाने केलंय. त्यामुळे सिनेमावरून नजर हटत नाही. पण तुम्ही सलग चार तास सिनेमा पाहत असाल तर अनेक ठिकाणी कंटाळाल.

सिनेमात शिव्यांचा जणू भरणाच

केला आहे. पहिल्या भागातही शिव्या होत्या, नाही असं नाही. पण दुसऱ्या भागात तर शिव्यांचा रतीबच घातला आहे. अभिनेत्याच्या तोंडी भरपूर शिव्या घातल्या तर प्रेक्षक टाळ्या वाजवतील, असं दिग्दर्शकाला वाटत असावं. खरं सांगायचं म्हणजे दिग्दर्शकाने हा चुकीचा समज मनातून काढला पाहिजे. ओटीटीवर सिनेमा पाहणं आणि शेकडो लोकांच्यासोबत मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओटीटीवर सिनेमा पाहताना तुम्ही एवढे ऑकवर्ड होत नाही, जेवढं थिएटरमध्ये पाहताना होता.

मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्यासाठी पुरुष आणि महिलाही जातात. तिथे तुम्ही एकमेकांना ओळखतही नसतात आणि पडद्यावर मात्र शिव्यांचा मारा सुरू असतो. सिनेमात ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणीही शिव्यांचा भरणा केलेला असतो. जबरदस्तीने शिव्या घुसडलेल्या असतात, त्या ऐकताना कसंनुसं होतं आणि ऑकवर्डही वाटतं. विशेष म्हणजे अशा शिव्यांचा भरणा केल्याने सिनेमा फार प्रभावी किंवा परिणामकारक होतो असं नाही.

या सिनेमातून नरेटिव्ह सेट

करण्याचाही प्रयत्न झालाय. चित्रपटाच्या सुरुवातीला डिस्क्लेमर दाखवून वास्तविक घटनांना फिक्शन गोष्टींशी जोडून एक नरेटिव्ह तयार करण्यापर्यंतचं क्रिएटिव्ह स्वातंत्र्य मिळतं का? हा खरा प्रश्न आहे. पहिल्या भागात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्याचं प्रमाण कमी होतं. सिनेमाच्या दुसऱ्या भागात तर नरेटिव्ह सेट करण्याचा सपाटाच लावण्यात आलाय. सिनेमा पाहताना केवळ मलाच तसं वाटत नाहीये, तर इतर प्रेक्षकांनाही तसंच वाटतंय, असं वाटतं.

जसं की या सिनेमात एक दृश्य आहे. त्यात पंतपधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान पदाची शपथ घेताना दाखवले आहेत. त्याचवेळी दुसरीकडे आयएसआय चीफ मेजर इकबाल आणि त्यांचे वडील हे दृश्य टीव्हीवर पाहत आहेत. मेजर इकबालचे वडील इकबाल यांना म्हणतात, “तू तर म्हणाला होतास आपले लोक जिंकतील. फंडिंगही केली होती.” आता 2014च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि यूपीएच्या विरोधातच मुख्य लढत होती हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आयएसआय यूपीएला फंडिंग करत होती का? हा सवाल हा सिनेमा पाहिल्यानंतर मनात येतो. या सिनेमातून हा प्रश्न निर्माण केला जातो, पण त्याचं उत्तर मिळत नाही. कारण उत्तर देणं हा हेतू नाहीये, तर नरेटिव्ह बिल्ड करणं हाच एकमेव हेतू आहे.

अशा असंख्य सीनमधून अजेंडा सेट

करण्यात आला आहे. नोटबंदी योग्य ठरवण्यासाठी या सिनेमात प्रॉपर प्लॉट बिल्डिंग करण्यात आला आहे. पाकिस्तानातून नकली नोटा भारतात येत आहेत, उत्तर प्रदेशातील निवडणुका त्यामुळे प्रभावित होतील, त्यामुळे नोटबंदी होणं आवश्यक होतं. अतिक अहमदला तुरुंगात टाकण्यासाठी डोभाल यूपीच्या डीजीपीला भेटतात. अतिक अहमद आयएसआयच्या एजंटच्या रुपात दाखवण्यात आले आहेत. जणू काही त्याच्यापूर्वी उत्तर प्रदेशात कोणतंही देशभक्त सरकार आलं नाही, हा भाव सिनेमातून दिसून येतो. या सिनेमात दाऊद इब्राहीमचा एक ट्रॅक आहे, तो एंगेजिंग आहे, पण सिनेमॅटिक ड्रामेटायजेशन अधिक आहे. नवाज शरीफ यांच्या सारखी हुबेहुब दिसणारी व्यक्तीही सिनेमात दाखवण्यात आलीय. सिनेमा फिक्शनल असेल तर फिक्शनल प्रेझेंटेशनही असलं पाहिजे. वास्तविक लोकांना दाखवून फिक्शनल गोष्टी दाखवणं हे एक प्रकारचं नरेटिव्ह बिल्डिंग आहे.

थिएटरमधून बाहेर पडल्यावर लक्षात राहील इतकं प्रभावी सिनेमाचं संगीत नाहीये. पहिल्या भागात रहमान डकैतच्या डान्स स्टेप्स होत्या, त्या प्रेक्षकांच्या मनात ठसल्या होत्या. दुसऱ्या भागात आरी आरी आणि तम्मा तम्माचे रिमिक्स व्हर्जन आहे, तो ठिकठाक आहेत. पण प्रेक्षकांच्या लक्षात राहील असा कोणताच सीन नाहीये. हां, पण अजेंडा सेटिंगवाल्या गोष्टी लक्षात राहतात हे मात्र नक्की.

सांगायचं तात्पर्य म्हणजे, तुम्हाला केवळ मनोरंजन हवं असेल आणि अजेंडा सेटिंगशी तुम्हाला काहीही घेणंदेणं नसेल तर हा सिनेमा पैसा वसूल आहे. रणवीर सिंहसाठी हा सिनेमा पाहावा असा सिनेमा आहे. पण तुम्हाला पहिल्या पार्टसारखंच काही तरी नवीन आणि उत्सुकता ताणवणारं बघायचं असेल तर तुमची निराशा होऊ शकते. सिनेमाचा समाजावर प्रभाव पडतो, असं तुम्हालाही माझ्या प्रमाणे वाटत असेल तर हा सिनेमा पाहताना तुम्हाला बरंच काही विचार करायला मिळेल.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in