• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 Uncensored Version: ‘धुरंधर 2’ मधून डिलिट केलेल्या ‘त्या’ 6 मिनिटांच्या सीनमध्ये नक्की काय?

March 26, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2 Uncensored Version: अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शिक ‘धुरंधर 2’ सिनेमाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर, भारताबाहेर देखील सिनेमा मोठे विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच सिनेमाने 575 कोटींचा गल्ला जमा केला आहे… सिनेमातील अभिनय आणि दिग्दर्शन तर उत्कृष्ट आहेच, पण त्याचबरोबर कथा, पटकथा आणि संगीताच्या बाबतीतही सिनेमा कमाल करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फटक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाचा बोलबाला आहे… पण सिनेमातील 6 मिनिटांच्या सीनवर कात्री फिरवण्यात आली आहे… याबद्दल एका फॅनने मोठा खुलासा केला आहे.

सांगायचं झालं तर, 5 डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ सिनेमात जेवढ्या शिव्या आणि रक्तपाताचे सीन नाहीत, त्यापेक्षा अधिक भयानक सीन ‘धुरंधर 2’ मध्ये आहेत. अशात, सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी सीबीएफसीने सिनेमाच्या एकूण वेळेतून सहा मिनिटं कमी केली. आता, एका चाहत्याने रणवीरच्या सिनेमातील कट न केलेला सीन पाहिला आहे.

एका चाहतीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणते, ‘सिनेमातील डिलिट न केलेला सीन पाहिला आहे. 20 तसांचा प्रवास करत चाहती कॅलिफोर्निया येथे पोहोचली आणि सिनेमा संपूर्ण पाहिला…’, चाहती म्हणाली, सिनेमाची ती आतुरतेने वाट पाहात होती आणि तिला संपूर्ण सिनेमा पाहायचा होता. पण जेव्हा तिला कळलं की, भारतीय सेन्सॉर बोर्डाने सिनेमा सहा मिनिटांनी कमी केल्यामुळे, ती कॅलिफोर्नियाला गेली, जिथे तिने संपूर्ण सिनेमा पाहिला.

डिलिट केलेल्या सीनमध्ये नेक्की काय?

चाहतीने जेव्हा व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा तिला अनेकांनी विचारलं की, डिलिट केलेल्या सीनमध्ये नक्की काय आहे. यावर ती म्हणाली, ‘काही फाईट सीन आणि काही शिव्यावर कात्री फिरवण्यात आली आहे… सिनेमातून अशी कोणतीच गोष्ट काढून टाकण्यात आलेली नाही, जे पाहिल्याशिवाय सिनेमा पूर्ण पाहिला असेल असं वाटेल…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील सिनेमाला डोक्यावर उचलून घेतलं आहे. आता येत्या  काही दिवसांत सिनेमा किकी कोटींपर्यंत मजल मारतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in