
Dhurandhar 2 Box Office Day 22 : अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर 2’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर बॉक्स ऑफिसवरील सिनेमाची गती मंदावली आहे. स्पाय थ्रिलर सिनेमाने पहिल्या दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे.. पण आता तिसऱ्या आठवड्यात अनेकांनी ‘धुरंधर 2’ सिनेमाकडे पाठ फिरवली आहे… बॉक्स ऑफिसवर सिनेमाच्या कमाईची गती मंदावली आहे. पण तरी देखील सिनेमाच्या कमाईचे आकडे चांगलं आहे… तर जाणून घ्या 22 व्या दिवशी म्हणजे चौथ्या गुरुवारी सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारली.
‘धुरंधर 2’ सिनेमाने 22 व्या दिवशी किती कोटी रुपयांची केली कमाई?
दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमा 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि सिनेमाने काही दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या हीट सिनेमांचा देखील ‘धुरंधर 2’ सिनेमाने रेकॉर्ड मोडला आहे… सिनेमाला प्रदर्शित होऊन आता 3 आठवडे झाले आहे… सिनेमाने अनेक बेंचमार्क सेट केले आहे, जे खोडून काढणं दुसऱ्या सिनेमांना कठीण आहे.
सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने पहिल्या आठवड्यात 674.17 कोटी रुपयांचा कमाई केली… दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 263.65 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. त्यानंतर तिसऱ्या आठड्यात, सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, सिनेमाने 22 व्या दिवशी 7.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे… सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात 110.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारताने आतापर्यंत 1048.42 कोटींचा गल्ला जमा केला आहे.
सांगायचं झालं तर, सिनेमाची कमाई होताना दिसत आहे. अशात सिनेमाला 1100 कोटी रुपयांचं लक्ष्य गाठता येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा आकडा गाठण्यासाठी सिनेमाला अधिक 52 कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे… जर सिनेमाने हा आकडा गाठला, तर 1100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा ठरेल…
‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पंडोर आणि मानव गोहिल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Leave a Reply