• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 BO Day 2: ‘धुरंधर 2’ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, 48 तसांत इतक्या कोटींची कमाई, आकडा थक्क करणारा

March 22, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2 BO Day 2: अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर 2’ सिनेमाने आपली कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिनेमामुळे रणवीर भारतीय सिनेविश्वातील आणखी एक मोठा स्टार झाला आहे… सांगायचं झालं तर, ‘धुरंधर 2’ सिनेमाने ‘धुरंधर’ सिनेमातील एका डायलॉग खरा करुन दाखवला आहे आणि तो म्हणजे, ‘किस्मत की एक बहूत खुबसूरत आदत है… कि वो वक्त आने पर बदलती नही…’, ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच हीट ठरला आहे. सर्व रेकॉर्ड मोडत सिनेमाने एक बेंच मार्क सेट केला आहे. प्रेक्षकांमध्ये सिनेमाचं क्रेझ इतकं आहे की, प्रदर्शनापूर्वीच सिनेमाने मोठी कमाई केली. आता दुसऱ्या दिवशीचे देखील कमाईचे आकडे समोर आले आहेत. तर जाणून घ्या ‘धुरंधर: द रिवेंज’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली?

‘धुरंधर 2’ सिनेमाच्या दुसऱ्या दिवसाची कमाई किती?

रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या स्पाय थ्रिलर ‘धुरंधर 2’ सिनेमाने फक्त रेकॉर्ड मोडले नाहीत, तर लीड अभिनेत्याच्या करियरला देखील एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. अनेक सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहोचतात. पण त्यापुढे जाणं मात्र कठीण होतं… तर रणवीर याच्या ‘धुरंधर 2’ सिनेमाने फक्त 48 तसांत मोठी कमाई केली आहे. सिनेमाचं नेट कलेक्शन 200 कोटींच्या पुढे पोहोचलं आहे.

सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, ‘धुरंधर 2’ ने पेड प्रिव्ह्यू शोमधून 43 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर पहिल्या दिवशी सिनेमाने 102.55 कोटींची कमाई केली… सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धुरंधर 2’ ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 80.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमाने हिंदीमध्ये सर्वाधिक 78.94 कोटी रुपये कमावले. त्यानंतर कन्नडमध्ये 0.03 कोटी रुपये 0.03 , मल्याळममध्ये 0.44 कोटी रुपये आणि तमिळमध्ये 1.30 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे सशुल्क प्रिव्ह्यू शोसह सिनेमाची एकूण कमाई 226.27 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

रणवीर सिंग यांच्या करियरमधील टॉप 10 सिनेमे (भारतीय नेट कलेक्शन

धुरंधर: 894.49 कोटी

पद्मावत: 300.26 कोटी

सिम्बा: 240.22 कोटी

धुरंधर 2: 226.27 कोटी (2 दिवसांत)

बाजीराव मस्तानी: 184 कोटी

रॉकी और रानी की प्रेम कहानी: 153.30 कोटी

गली बॉय: 139.38 कोटी

राम लीला: 117.53 कोटी

दिल धडकने दो: 76.88 कोटी



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
  • ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?
  • Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in