• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : सहाव्या दिवशी ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर आणली कमाईची त्सुनामी; मोडला 4 चित्रपटांचा विक्रम

March 25, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 मार्च रोजी याचे पेड प्रीव्हू आयोजित करण्यात आले होते. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि तेव्हापासूनच रणवीर सिंहच्या या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता हा चित्रपट देशभरातच नाही तर जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी ‘धुरंधर 2’ने जबरदस्त कमाई करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

‘धुरंधर 2’ची जगभरात किती कमाई?

‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: त्सुनामी आणली आहे. दररोज या चित्रपटाच्या कमाईचा वेग वाढतच असून प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी परदेशात जवळपास 231.57 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आता ‘धुरंधर 2’च्या वर्ल्डवाइड कलेक्शनचा आकडा 919 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कमाईसह रणवीरच्या या चित्रपटाने चार चित्रपटांना मात दिली असून जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर 2’ने रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या लाइफटाइम कमाईला मागे टाकलं आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 917 कोटी रुपये कमावले होते. तर सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने जगभरात 918.18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

जगभरात सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 भारतीय चित्रपट

दंगल- 1968.03 कोटी रुपये
धुरंधर- 1350.83 कोटी रुपये
जवान- 1148.32 कोटी रुपये
पठाण- 1050.3 कोटी रुपये
धुरंधर 2- 919 कोटी रुपये
बजरंगी भाईजान- 918.18 कोटी रुपये
अॅनिमल- 917.82 कोटी रुपये
सिक्रेट सुपरस्टार- 875.78 कोटी रुपये
स्त्री- 874.58 कोटी रुपये

‘धुरंधर 2’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारतात 56.55 कोटी रुपये कमावले आहेत. यासह आतापर्यंत देशभरातील कमाईचा आकडा 575.67 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘धुरंधर 2’ने अवघ्या सहा दिवसांत कमाईचा 900 कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून सर्वांत जलद गतीने हा टप्पा गाठणारा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट 1000 कोटींच्या विक्रमापासून फक्त काही पावलंच दूर आहे. ‘धुरंधर’ या पहिल्या भागाने एकूण 1300 कोटी रुपयांचा कमाई केली होती. पुढील काही दिवसांत सीक्वेल याचाही रेकॉर्ड मोडणार असल्याचं स्पष्ट दिसतंय.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in