• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : सगळेच धुरंधर 2 च भरपूर कौतुक करतायत, पण आदित्य धरने एक मोठी चूक केलीच! लोकांनी पकडलेली ती चूक काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर स्वप्नवत प्रवास सुरु आहे. रिलीज आधीच या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पहायला मिळाली होती. आता रिलीजनंतर प्रेक्षक या चित्रपटावर तुटून पडले आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवीन उच्चांक नोंदवत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रिटी या चित्रपटाबद्दल भरभरुन बोलत आहेत. ऋषभ शेट्टी, रवि तेजा, रितेश देशमुख, अनुपम खेर आणि रकुल प्रीत सिंह सारख्या स्टार्सनी सोशल मीडियावर धुरंधर 2 च भरपूर कौतुक केलय. इंटरनेट युजर्सनी सुद्धा आदित्य धरच्या चित्रपटातील पीक डिटेलिंगच खूप कौतुक केलय. पण याच दरम्यान युजर्सनी चित्रपटातील एक मोठी चूकही पकडलीय. चित्रपटातील एका सीनमध्ये कॅमेरामनची झलक दिसते.

एक्स युजरने एक व्हिडिओ शेअर केला. यात कॅप्शनमध्ये लिहिलय की, एक कॅमेरामन सीनमध्ये दिसतोय. आदित्य धरची पीक डिटेलिंग खूप अप्रतिम आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंह फाइट करताना दिसतोय. त्यावेळी एका काचेमध्ये कॅमेरामनची झलक दिसली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फॅन्सनी त्यावर Reaction दिली आहे. एका युजरने लिहिलय की, 100 पीक डिटेलिंगमध्ये एक चूक झाली. दुसऱ्या युजरने लिहिलय की, एका गन फायर सीनमध्ये साऊंड इफेक्ट नाहीय LOL. काही युजर्स याला AI व्हिडिओ म्हणतायत.

जगभरात या चित्रपटाने किती कमाई केलीय?

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ 19 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झालाय. यात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि दानिश पंडोर महत्वाच्या भूमिकेत आहेत. 18 मार्चला चित्रपटाचे प्रिव्यु शोज झाले. या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 350 कोटी पार नेट कलेक्शन केलय. या चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 500 कोटीच्या पुढे गेलं आहे.

#DhurandharTheRevenge the very first scene pulls you in and never lets go. Every frame hits like a war drum.

This isn’t just a sequel; it’s a statement. Brilliant storytelling, brother absolutely loved the detailing, @AdityaDharFilms.

Top-notch performances by every single… pic.twitter.com/ugT7KkksMJ

— Rishab Shetty (@shetty_rishab) March 21, 2026

 

Dhurandhar 2 Mistake

पहिला सीनच तुम्हाला खेचून घेतो

कांतारा फेम ऋषभ शेट्टीने सुद्धा इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं कौतुक केलय. “या चित्रपटाचा पहिला सीनच तुम्हाला खेचून घेतो, जो तुम्हाला कधी सोडतच नाही. प्रत्येक फ्रेम युद्धाच्या ड्रम सारखी वाजते. हा फक्त एक सीक्वल नाही, एक स्टेटमेंट आहे” त्याने आदित्य धरच्या डिटेलिंगच कौतुक केलय. प्रत्येक कलाकाराने टॉप परफॉर्मन्स दिलाय.

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Price Today : युद्धविरामानंतर सोनं स्वस्त, ही संधी सोडू नका .. पुढला काय भरवसा ? सोनं-चांदीचे आजचे दर काय ?
  • पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
  • कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी
  • तर लाडकी बहीण योजना रोखावीच लागेल – उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in