• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : बॉलिवूडच्या इतिहासात जे कोणालं जमलं नाही ते रणवीरच्या ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी करुन दाखवलं!

March 22, 2026 by admin Leave a Comment


रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ (धुरंधर 2) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतात एकूण 21 हजार 728 शोजमधून ‘धुरंधर 2’ने 102.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह रणवीर सिंहच्या या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे हा फक्त हिंदीतलाच नाही तर अ प्रमाणपत्र मिळूनही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर 18 मार्च रोजीच्या पेज प्रीव्हूयमधून ‘धुरंधर 2’ने 43 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवसांची कमाई मिळून ‘धुरंधर 2’ने 145.5 कोटींचा आकडा गाठला आहे.

‘धुरंधर 2’ने मोडले अनेक रेकॉर्ड्स

गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या तिकिटांची बुकिंग जबरदस्त झाली होती. परंतु 19 मार्च रोजी देशातील काही थिएटर्समध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे शोज रद्द झाले. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडले आहेत. ‘धुरंधर 2’ने प्रभासच्या ‘सालार’ आणि ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांच्या कमाईचा आकडा पाहता रणवीरचा हा चित्रपट टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. याआधी ‘पुष्पा 2: द रुल’ने 164.25 कोटी रुपये, RRR ने 133 कोटी रुपये, बाहुबली 2: द कन्क्लुजनने 121 कोटी रुपये आणि केजीएफ 2 ने 116 कोटी रुपये पहिल्याच दिवशी कमावले होते. ट्रेड साइट ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ची पहिल्या दिवसाची जगभरातील कमाई 236.63 कोटी रुपये झाली आहे.

‘धुरंधर 2’ने ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा रेकॉर्डब्रेक झाली होती. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 15 लाखांहून अधिक तिकिटं ॲडव्हान्समध्ये विकली गेली होती. यामध्ये बुधवारच्या पेड प्रीव्हयूचाही समावेश आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका असून त्याच्यासोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in