• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : नजर काढा, मूठभर लाल मिर्चीने भागणार नाही तर..धुरंधर 2 पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या मोठ्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

April 10, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपट रसिकांवर ‘धुरंधर द रिवेंज’ या सिनेमाने एक वेगळीच जादू केली आहे. धुरंधर सिनेमाचा हा सीक्वल म्हणजे दुसरा भाग आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहेच. कमाईत 1000 कोटींचा टप्पा या चित्रपटाने ओलांडला आहेच. पण पैशांपेक्षा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाचं समाधान करतो. थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. हे या चित्रपटाचं यश आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना जसा आवडतोय. तसं या चित्रपटावर टीका करणारा सुद्धा एक वर्ग आहे. जो या चित्रपटाला प्रोपेगेंडा ठरवत आहे. त्यामुळे या चित्रपटाचे समर्थक विरुद्ध विरोधक असं दोन गट पडले आहेत. 19 मार्चला धुरंधर 2 रिलीज झाला. पहिल्या भागात अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तरित होती. त्याची उत्तर मिळवण्यासाठी अगदी पहिल्या शो पासून प्रेक्षकांनी या चित्रपटाला गर्दी केली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी धुरंधर 2 च भरभरुन कौतुक केलं. धुरंधर चित्रपटामुळे येणाऱ्या दिवसात फिल्म मेकिंगमध्ये मोठे बदल होणार आहेत. आदित्य धरकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, अशा शब्दात राम गोपाल वर्मा यांनी धुरंधर आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं कौतुक केलं. आता ‘एनिमल’ फेम डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा यांनी सुद्धा जाहीरपणे या चित्रपटावर आपलं मत मांडलय. बिनधास्त बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संदीप रेड्डी वांगा यांनी धुरंधरच्या टीकाकारांना सरळ सुनावलं आहे. संदीप रेड्डी वांगा हे ते डायरेक्टर आहेत, ज्यांनी फक्त अभिनयाच्या बळावर ‘एनिमल’ चित्रपट हिट होऊ शकतो हे दाखवून दिलं.

इंडस्ट्रीबद्दल मांडलं परखड मत

संदीप रेड्डी वांगा यांनी धुरंधर चित्रपटाचं कौतुक करताना अजूनपर्यंत मौन धारण करुन राहिलेल्या इंडस्ट्रीच्या लोकांवर निशाणा साधला. सत्याला प्रोपेगेंडा ठरवण्याचं एक वेगळचं चलन सुरु झालय असं ते म्हणाले. संदीप रेड्डी वांगा यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. “अनेक लेखक आणि एक्टर्सनी स्वत: प्रोपेगेंडाच्या बळावर आपलं करिअर उभं केलं. त्यावेळी अख्खी फिल्म इंडस्ट्री मूग गिळून गप्प बसली होती. पण आता तेच लोक धुरंधर 2 ची खिल्ली उडवत आहेत” असं संदीप रेड्डी वांगा यांनी लिहिलय.

अख्ख शेत जाळावं लागेल

“काल रात्री चित्रपट बघितला. खूप जबरदस्त आहे. आदित्य धर आणि रणवीर सिंह तुम्हाला जी काळी नजर लागलीय, ती इतक्या सहजतेने हटणार नाही. नजर काढण्यासाठी फक्त मूठभर लाल मिर्चीने काम होणार नाही, अख्ख शेत जाळावं लागेल” अशा शब्दात धुरंधरच कौतुक करताना इंडस्ट्रीतल्या लोकांना सुनावलं आहे. संदीप रेड्डी वांगाने आपली पोस्ट डायरेक्ट आदित्य धर आणि रणवीर सिंह यांना टॅग केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…
  • LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य
  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in