• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ सिनेमातील बडे साहब नक्की कोण? मोठं सत्य अखेर समोर आलंच

March 13, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2: ‘रो क्यों रहा है लाले, तूने सुना नाहीं जहां दर्द है, वहां मर्द है…’, ‘पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा…’, असे एकापेक्षा एक डायलॉगने ‘धुरंधर 2’ सिनेमा ट्रेलर हिट झाला. आता प्रत्येक जण फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमा प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे, त्याच प्रमाणे सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे… सोशल मीडियावर देखील सिनेमाबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. दरम्यान, ‘धुरंधर’ सिनेमाने जगभरात विक्रम रचला, पण प्रेक्षकांना सिनेमाने कोड्यात टाकलं आहे… सिनेमात कुठेच न दिसणारा, पण त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व कुरापती सुरु असणारा बडे साहब नक्की आहे तरी कोण? आता याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे…

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता इमरान हश्मी ‘धुरंधर 2’ सिनेमा बडे साहबच्या भूमिकेत दिसणार नाही… एवंढच नाहीतर, इमरान हाश्मी याच्यापूर्वी सोशल मीडियावर सिनेमात बडे साहब याच्या भूमिकेत अभिनेता सलमान खान दिसेल… अशी देखील चर्चा रंगलेली होती. पण रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, सिनेमात बडे साहबच्या भूमिकेत इमरान हाश्मी आणि सलमान खान नसणार आहेत. त्यामुळे बडे साहब कोण आहे? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

यामी गौतम हिच्यासोबत आणखी एक स्पेशल कॅमियो…

‘धुरंधर 2’ सिनेमात दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. सिनेमात यामी कॅमियो करताना दिसणार आह … पण यामी व्यतिरिक्त, निर्माते सिनेमात आणखी एक खास कॅमिओ करण्याची योजना आखत आहेत, असं देखील रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. पण, नेमकी भूमिका काय असेल हे सध्या समजलेलं नाही. रणवीर सिंगसोबत, सिनेमात पुन्हा एकदा सारा अली खान, राकेश बेदी, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त सारखे कलाकार दिसणार आहेत.

अक्षय खन्ना ‘धुरंधर 2’ मध्ये दिसणार आहे?

‘धुरंधर’ सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने रेहमान डकैत याची भूमिका निभावली. सिनेमाच्या पहिल्या भागात रेहमान याची हत्या करण्यात आली. पण ‘धुरंधर 2’ सिनेमात पुन्हा दिसेल असं देखील सांगण्यात येत आहे. यावेळी सिनेमाच्या माध्यमातून रेहमान डकैत याचा इतिहास समोर येणार.. असं देखील सांगितलं जात आहे. ट्रेलरमध्ये देखील अक्षय खन्ना याची एक झलक दाखवण्यात आली. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे… त्यामुळे ‘धुरंधर 2’ सिनेमा पाहण्याची अनेकांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in