• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा फिल्म ठरवणाऱ्यांना प्रसिद्ध डायरेक्टर राम गोपाल वर्मांचं रोखठोक उत्तर, मग तुम्ही…

March 26, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर धुरंधर चित्रपट घेऊन आल्यापासून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सतत त्याचं चित्रपटाबद्दल बोलतायत. ते आदित्य धरच्या कामावर खूप प्रभावित झाले आहेत. राम गोपाल वर्मा धुरंधरचं कौतुक करताना थकत नाहीय. धुरंधर सिनेमामुळे भारतीय सिनेमात बदल येईल असच ते म्हणत आहेत. राम गोपाल वर्मा फिल्म इंडस्ट्रीमधील असे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी ‘धुरंधर द रिवेंज’चा रिव्यू सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या मते हा चित्रपट शोले पेक्षा अनेक पटीने चांगला आहे. आता चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना हा चित्रपट शानदार वाटलाय. अन्य लोकांनी या फिल्मला प्रोपेगेंडा ठरवलय.

‘धुरंधर द रिवेंज’मध्ये मोदी सरकारच्या नोटबंदीपासून दहशतवाद अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे. त्यामुळे काही जण या चित्रपटाला प्रोपेगेंडा ठरवतायत. सोशल मीडियावर यावरुन वादविवाद सुरु आहेत. आता राम गोपाल वर्मा यांनी धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा चित्रपट ठरवण्यावर रिएक्ट केलय.

तो आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार

न्यूज एजेंसी ANI शी बोलताना राम गोपाल वर्मा म्हणाले की, “प्रोपेगेंडाचा अर्थ मला समजत नाही. प्रत्येक माणसाचा आपला एक दृष्टीकोन असतो. जर, कोणावर आरोप झाले, तर समोरचा जो डिफेन्सनमध्ये आहे, तो आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार” “सगळे लोक आपपाली बाजू मांडतील. आदित्यने चित्रपटाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं आहे. आदित्यने जे म्हटलय ते तुम्हाला मान्य नसेल, तुम्हाला तो प्रोपेगेंडा, खोटं वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा त्या विरोधात चित्रपट बनवा ना” असं राम गोपाल वर्मा सरळ बोलले.

#WATCH | Mumbai | On ‘Dhurandhar: The Revenge’ movie, Bollywood Film Director Ram Gopal Varma says, “Calling Dhurandhar just a movie is doing injustice to it…I have a lot to learn from Director Aditya Dhar…The impact of the film is huge…Dhurandhar 2 has set a new… pic.twitter.com/1SGYRmi1h7

— ANI (@ANI) March 23, 2026

भारतीय सिनेमाला मार्ग दाखवला

राम गोपाल वर्मा यांनी आदित्य धरचे आभार मानलेत. त्यांनी म्हटलं की, “आदित्य धरने भारतीय सिनेमाला मार्ग दाखवला आहे. त्यांच्या मते धुरंधरला फक्त चित्रपट म्हणणं चुकीच आहे” “मागच्या 20-30 वर्षात असा एकही चित्रपट आलेला नाही. या चित्रपटाची मेकिंग जबरदस्त आहे” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in