• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

dhurandhar 2 : धुरंधर 2 मध्ये NSA अजित डोवाल यांच्याशी संबंधित त्या रहस्याचं उत्तर नाही मिळणार

March 22, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धरचा धुरंधर 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड कमाई करतोय. धुरंधरच्या पहिल्या पार्टमध्ये आर माधवनचा छोटासा रोल होता. तेच धुरंधर 2 मध्ये त्याचा महत्वाचा रोल आहे. म्हणूनच त्याच्या कॅरेक्टरची खूप चर्चा होतेय. आर. माधवनने चित्रपटात अजय सान्यालचा रोल प्ले केलाय. हे कॅरेक्टर NSA अजित डोवाल यांच्यावर आधारित आहे. त्यामुळेच लोक अजित डोवाल यांच्याबद्दल जाणून घ्यायला जास्त उत्सुक आहेत. खऱ्या आयुष्यात अजित डोवाल यांनी हमजा अली मजारी उर्फ जसकीरत सिंह रांगी याच्यापेक्षा खतरनाक मिशन्स केले आहेत.

डी. देवदत्त आणि महेश वाघ लिखित ‘अजित डोवाल-ऑन अ मिशन’ या पुस्तकानुसार भारताला 1980 च्या दशकात समजलेलं की, पाकिस्तान गुपचूपपणे कहुटा येथे अणूबॉम्ब बनवत आहे. अजित डोवाल त्यावेळी पाकिस्तानात भारताचे गुप्तहेर म्हणून वावरत होते. डोवाल कहुटा येथील पाकिस्तानच्या अण्विक प्रकल्पाजवळ हेरगिरी करायचे. कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी ते कधी भिखारी तर कधी मजुराचा वेश धारण करायचे.

रेडिएशन आणि युरेनियमचे अंश आढळले

कहुटाच्या अणू प्रकल्प तळाजवळ एक सलून होतं. तिथे येणाऱ्या वैज्ञानिकांच्या केसांचे नमुने डोवाल यांनी गोळा केल्याचं बोललं जातं. त्या केसांची भारतीय प्रयोगशाळेत लॅब टेस्टिंग झाली, त्यावेळी त्यात रेडिएशन आणि युरेनियमचे अंश आढळले. त्याच पुराव्यावरुन पाकिस्तान अणूबॉम्ब बनवत असल्याचं सिद्ध झालं.

मी इस्लाम धर्म स्वीकारला

अजित डोवाल मुस्लिम बनून पाकिस्तानात मिसळून गेले होते. ते ऊर्दू इतकी सुंदर बोलायचे की कोणाला संशय येणार नाही. एकदा लाहोरमध्ये एका मशिदीबाहेर एक वृद्धाने त्यांना ओळखलं होतं. त्याने डोवाल यांना सांगितलं की, तुझ्या कानाना होल आहे. तू हिंदू आहेस. डोवाल यांनी चतुराईने लगेच उत्तर दिलं की, बालपणी माझ्या कानांना छिद्र पाडलं त्यानंतर मी इस्लाम धर्म स्वीकारला. अजित डोवाल यांनी भारतासाठी पार पडलेल्या या धोकादायक मिशनची नेहमी चर्चा होते. म्हणूनच त्यांना भारताचं जेम्स बॉण्ड म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते अत्यंत विश्वासू निकटवर्तीय मानले जातात. भारतात मोदी सरकार आल्यापासून ते देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. धुरंधर 2 मध्ये मात्र अजित डोवाल यांच्याशी संबंधित ही कथा दाखवण्यात आलेली नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
  • ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?
  • Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in