• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ मध्ये अतीक अहमद… दाऊद इब्राहिम आणि नोटबंदीचा कट…, नेमकं कनेक्शन काय?

March 22, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंग दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमाचंच वातावरण सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे… सिनेमाची कथा नक्की कोणत्या गोष्टींभोवती फिरत आहे… हे समोर आलं आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहे… सत्य घटना आणि काही काल्पनिक गोष्टींच्या आधारावर सिनेमाला रंजक टच देण्याचा प्रयत्न दिग्दर्शत आदित्य धर याने केला आहे. रणवीरचे ॲक्शन सीक्वेन्स आणि आर. माधवनचे दमदार डायलॉगने प्रेक्षकांना शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायला भाग पाडलं आहे. पण जेव्हा उत्तर प्रदेशचा राजकारणी आणि गुंड अतीक अहमद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, बनावट नोटांचे रॅकेट आणि नोटाबंदीच्या घोषणा पाहतात, तेव्हा सगळेच थक्क होतात. आदित्य धरने ज्या पद्धतीने आणि ज्या उद्देशाने सर्व गोष्टींचा चित्रपटाच्या कथेत समावेश केला आहे, त्यावर चर्चा आणि वादविवाद होणे निश्चित आहे.

अतीक अहमदचा काळा कारभार…

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिनेमात अतीत अहमद याला यूपीचा पूर्व नेत्याच्या भूमिकेत दाखवलेलं नाही. पण राजकारणातील बाहुबली म्हणून त्याची भूमिका प्रेक्षकांपुढे आणली आहे. तो पांढरे कपडे घालतो, पण गोष्टी कायम एखाद्या गँगस्टर प्रमाणे करतो… फेक करंसी… ड्रग्स त्यानंतर शस्त्राचा पुरवठा… फोन कायम अतीक काळ्या कारभाराबद्दलच बोलताना दिसतो… त्यामुळे, त्याचं कनेक्श फक्त उत्तर प्रदेश आणि प्रयागराजपर्यंतच नाही, तर नेपाळमार्गे पाकिस्तान आणि दुबईपर्यंतही पसरलेलं आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर त्याचा मोठा प्रभाव आहे. ही भूमिका सलीम सिद्दीकी बजावतात.

बेडवर पडलेला वृद्ध दाऊद सुद्धा रचतोय कट…

‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी ‘बडे साहब’ ची सर्वत्र चर्चा होती. आयएसआय प्रमुख मेजर इक्बालची भूमिका साकारणारा अर्जुन रामपाल, एका ‘बडे साहब’शी वारंवार फोनवर बोलताना दिसतो. रणवीर सिंगने साकारलेल्या हमजा अलीला, आयएसआय प्रमुखापेक्षाही वरचढ असलेला हा ‘बडे साहब’ नक्की कोण आहे, हेच कळत नाही. जेव्हा अर्जुन त्याची भेट घालून देतो, तेव्हा रणवीर सिंग याला कळतं की, बजे साहब म्हणजे दाऊद इब्राहिम आहे… दाऊदची भूमिका अभिनेता दानिश इक्बाल याने साकारली आहे.

सिनेमात दाऊद लाचर दाखवण्यात आला आहे. पण भारताबद्दल कट तो बेडवर असून सुद्धा रचत असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे… वृद्ध झालेला आणि बेडवर पडलेला दाऊद  भारतात अशांतता कशी निर्माण करायची याबद्दल आयएसआय आणि त्याच्या हस्तकांना सतत सूचना देतो. यासाठी त्याच्याकडे दोन योजना आहेत: एक: पंजाबला अमली पदार्थांचा पुरवठा करणे, आणि दुसरी: नेपाळमार्फत बनावट चलनाचा पुरवठा करणे.

भारतात बनावट नोटा पाठवण्याचा मोठा कट

‘धुरंधर’ सिनेमाच्या पहिल्या भागात तुम्ही पाहिलं असेल, खनानी ब्रदर्सचा उल्लेख करण्यात आलाय आणि नकली नोटांचा छापखाना देखील दाखवण्यात आला आहे. तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात खनानी ब्रदर्सच्या जावेज खनानी याची भूमिका वाढली… दाऊदच्या माध्यमातून त्याला भारताला हजारो कोटी रुपयांची बनावट नोटा पुरवण्याचे कंत्राट दिलं जातं.
तेव्हा मुद्दा उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा दाखवण्यात आला. आयएसआय, दाऊद आणि खाननी चर्चा करतात की, उत्तर प्रदेशातील सत्तांतर रोखण्यासाठी आतिफ अहमद हे सर्वात शक्तिशाली साधन ठरू शकते. त्याला दाऊद आणि आयएसआयचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून सिनेमात चित्रित करण्यात आलं आहे.

नोटबंदीच्या घोषणेने पाकिस्तानी दहशतवादी पेचात

सिनेमात दाखवल्यानुसार, पाकिस्तानला पाठवलेल्या एका भारतीय गुप्तहेराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या सांगण्यावरून सीमेपलीकडील दहशतवादी सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या बनावट नोटा भारतात पाठवण्याची योजना आखत होते आणि बनावट नोटांचा पुरवठा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींच्या आधी करण्यास सांगण्यात आलं.

धुरंधर 2 मध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, नोटाबंदीच्या घोषणेमुळे केवळ पाकिस्तानात बनावट नोटा छापणाऱ्या जावेद खाननीलाच नव्हे, तर आयएसआय प्रमुख मेजर इक्बाल, दुबईतील दाऊद आणि भारतीय तुरुंगात असलेल्या अतीक अहमद यांनाही मोठा धक्का बसला…तेव्हाच सिनेमात एक डायलॉग आहे – भाई, हिंदुस्तान में अब हवा बदल गई है. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in