• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’ची डिमांड एवढी की थिएटर मालकांना घ्यावा लागला मोठा निर्णय

March 18, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे 48 तास राहिले आहेत. या चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल झाले आहेत. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनच्या बाबतीत रणवीर सिंहचा हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. ‘धुरंधर 2’चे लाखो तिकिट्स विकले गेले आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये असलेली एवढी क्रेझ पाहून अखेर थिएटर मालकांना महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांनी रात्री उशिराचे आणि मध्यरात्रीचेही काही शोज नव्याने समाविष्ट केले आहेत. त्यामुळे भारतातील अनेक भागात या चित्रपटाचे 24 तास शोज लागणार आहेत.

24 तासांचे शोज

‘धुरंधर 2’चे आतापर्यंत भारतात 15 लाख तिकिटं विकली गेली आहेत. यापैकी निम्मा आकडा हा बुधवारी पार पडणाऱ्या प्रिव्ह्यू शोजसाठी आहे. जवळपास चार तासांच्या या चित्रपटासाठी थिएटरमध्ये एका स्क्रीनवर चारपेक्षा अधिक शोज लावले जाणार आहेत. प्रेक्षकांची वाढती मागणी पाहून बऱ्यात थिएटर चेन्सने मध्यरात्रीचेही शोज समाविष्ट केले आहेत. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात असं क्वचित एखाद्या चित्रपटाबाबत घडतं. यावरून या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात येते.

मुंबई आणि ठाण्यातील पीव्हीआर चकाला, मूव्ही मॅक्स सायन यांसारख्या थिएटर्समध्ये वीकेंडला मध्यरात्री 1.50 पासूनचे शोज लावण्यात आले आहेत. रात्री 11.30 पर्यंत हे शोज वेगवेळ्या स्क्रीन्सवर लावले जाणार आहेत. लॉजिस्टिक आणि सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे सर्वच शहरांमध्ये हे शक्य नसलं, तरी पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक थिएटर्स 24 तासांत याच मार्गाचा अवलंब करतील आणि रात्री उशिराचे शोज सुरू करतील, असं म्हटलं जात आहे.

मराठा मंदिरमधील DDLJ च्या शोची वेळ बदलली

‘धुरंधर 2’च्या लोकप्रियतेचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे मुंबईतल्या आयकॉनिक मराठा मंदिर थिएटरमध्येही या चित्रपटाने आपली जागा निश्चित केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून सलग या थिएटरमध्ये शाहरुख खान आणि काजोलचा ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट दाखवला जात होता. दररोज सकाळी 11.30 वाजता या चित्रपटाचा शो इथे लावला जात होता. परंतु आता ‘धुरंधर 2’मुळे या चित्रपटाची वेळ बदलण्यात आली आहे.

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पेड प्रीव्ह्यूजमध्ये जवळपास 8 लाख तिकिटं विकली गेली असून 35 कोटी रुपयांची कमाई त्यातून झाली आहे. रणवीरच्या या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा तब्बल 125 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट कमाईचे सर्व विक्रम मोडणार, असा अंदाज व्यक्त होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in