• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’चा टीझर पाहताच प्रेक्षकांची प्रचंड निराशा; नाराजी व्यक्त करत म्हणाले..

February 3, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांपासून अनेकजण त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. परंतु हा टीझर पाहताच अनेकांची प्रचंड निराशा झाली. यामागचं कारण म्हणजे ‘धुरंधर 2’च्या टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये. जे टीझरमध्ये पहायला मिळालं, तेच सर्व ‘धुरंधर’च्या क्लायमॅक्सनंतर थिएटरमध्ये दाखवण्यात आलं होतं. चित्रपट संपल्यानंतर श्रेयनामावली सुरू असताना एका बाजूला सीक्वेलची झलक दाखवण्यात आली होती. यात सर्वकाही तेच पहायला मिळालं होतं, जे आता ‘धुरंधर 2’च्या टीझरमध्ये दिसतंय. त्यामुळे अनेकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘धुरंधर 2’च्या टीझरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘यात नवीन काहीच नाही, हे सर्व आम्ही पाहिलंय’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हाच टीझर आम्ही पहिल्या भागाच्या शेवटी पाहिलं होतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘नवीन काहीतरी पहायला मिळेल, असं वाटलं होतं. आता ट्रेलरसुद्धा लगेच प्रदर्शित करा’, असं आणखी एकाने लिहिलंय. टीझरबद्दल प्रेक्षकांमध्ये नाराजी असली तरी यातील रणवीर सिंहच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

रेहमान डकैतच्या मृत्यूनंतर आता हमजाचं ल्यारीवर राज्य आहे. तो हमजा कसा बनतो, त्याला प्रशिक्षण कसं दिलं जातं.. याची कथा या सीक्वेलमध्ये पहायला मिळणार आहे. ‘ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी..’ हा चर्चेतला डायलॉगसुद्धा या टीझरच्या शेवटी रणवीरच्या तोंडून ऐकायला मिळतो. आदित्य धरच्याच ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह हा पाकिस्तानातील ल्यारी शहरामधील दहशतवादी गटात शिरून हेरगिरी करणाऱ्या हमजा अली मजारीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात संजय दत्त हा एसपी चौधरी असलम, आर. माधवन हा अजय सन्याव, अर्जुन रामपाल हा मेजर इक्बाल, राकेश बेदी हे जमील जमाली आणि सारा अर्जुन ही यलिना जमालीच्या भूमिकेत आहे. तर दानिश पंडोरने उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागात रेहमान डकैतचा खात्मा होतो. परंतु अक्षय खन्नाने साकारलेली ही भूमिका फ्लॅशबॅकच्या रुपात सीक्वेलमध्ये दिसणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांच्या पक्षाचा मोठा निर्णय, एकाच नेत्याला सगळे अधिकार; 9 तारखेला होणार मोठे खुलासे!
  • ‘धुरंधर’ सोडा या चित्रपटाने 100 दिवस बॉक्स ऑफिसवर केलं राज्य, 57 वर्षांपूर्वी रचला इतिहास, कमाई पाहून डोळे फिरतील
  • GK : हे राज्य आहे पर्यटनाची राजधानी, दरवर्षी करोडोंची होते उलाढाल
  • भारत की…! T20 वर्ल्डकप स्पर्धेत कोणाचं पारडं जड? 20 संघांचं विजयाचं गणित समजून घ्या
  • Pune News : पुण्यात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सहा महिलांची झाली सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in