• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2: अवघे 2 सीन्स, तरी ‘धुरंधर 2’मध्ये सोडली छाप; मास्टरमाइंडच्या पत्नीची भूमिका

March 22, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेता आर. माधवनने मास्टरमाईंड अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. ही भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन साकारण्यात आली आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील आर. माधवनचे सर्व सीन्स दमदार आहेत. हमजाच्या मिशनचं मार्गदर्शन तो करत असतो. अजय सन्याल बनलेल्या आर. माधवनसोबतच त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीनेही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील आर. माधवनचे सर्व सीन्स दमदार आहेत. हमजाच्या मिशनचं मार्गदर्शन तो करत असतो. अजय सन्याल बनलेल्या आर. माधवनसोबतच त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीनेही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

'धुरंधर 2'मध्ये अभिनेत्री जान्हवी बंसलने अजय सन्यालच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात जान्हवीचे फक्त दोनच सीन्स आहेत. तरीसुद्धा त्या दोन सीन्समध्ये तिने आपल्या अभिनयकौशल्याची जबरदस्त छाप सोडली आहे. चाहते तिला थिएटरमधून तिचे क्लिप्स पाठवत असल्याचा खुलासा जान्हवीने केला आहे.

जान्हवी बंसल पंजाबी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर काही भूमिकांसाठी तिने पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी जेव्हा तिला 'धुरंधर 2'मध्ये पाहिलं तेव्हा ते खुश झाले.

जान्हवी बंसल पंजाबी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर काही भूमिकांसाठी तिने पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी जेव्हा तिला 'धुरंधर 2'मध्ये पाहिलं, तेव्हा ते खुश झाले.

जान्हवीने सेटवरील काही फोटोसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 'धुरंधर 2'मधील पूजेचा सीन हा महाशिवरात्री रोजी शूट झाल्याचं तिने सांगितलं. या सीनमध्ये महामृत्युंजयचा जो जप करण्यात आला तो खराखुरा होता असंही ती म्हणाली.

जान्हवीने सेटवरील काही फोटोसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 'धुरंधर 2'मधील पूजेचा सीन हा महाशिवरात्री रोजी शूट झाल्याचं तिने सांगितलं. या सीनमध्ये महामृत्युंजयचा जो जप करण्यात आला, तो खराखुरा होता, असंही ती म्हणाली.

सेटवरचं वातावरण धार्मिक झालं होतं. यादरम्यान आदित्य धरसुद्धा त्याचं दिग्दर्शनाचं काम करत होता. मला सेटवरील वातावरण खूप आवडलं होतं आणि या भूमिकेमुळे जी ओळख मिळतेय त्यानेही मी फार खुश आहे अशा शब्दांत जान्हवी व्यक्त झाली.

सेटवरचं वातावरण धार्मिक झालं होतं. यादरम्यान आदित्य धरसुद्धा त्याचं दिग्दर्शनाचं काम करत होता. मला सेटवरील वातावरण खूप आवडलं होतं आणि या भूमिकेमुळे जी ओळख मिळतेय, त्यानेही मी फार खुश आहे”, अशा शब्दांत जान्हवी व्यक्त झाली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in