• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?

March 28, 2026 by admin Leave a Comment


Dhurandhar : पाकिस्तानात भिकाऱ्यांचं आयुष्य फार कठीण झालं आहे. सध्या पाकिस्तानात भिकाऱ्यांविरोधात पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनचा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर, अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहे. सर्च ऑपरेशनमुळे मोठ्या संख्येने अटकसत्र तर सुरू आहेच, पण या कारवाईचा संबंध ‘धुरंधर’ या सिनेमाशी जोडला जात आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, सिनेमातील अभिनेता रणवीर सिंगची भूमिका ‘हमजा अली मदारी’ समोर आल्यानंतर पाकिस्तानात भिकाऱ्यांविरुद्ध एक विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली.

व्हायरल होत असलेल्या दाव्यात असं देखील सांगण्यात आलं आहे की, पोलीस भिकाऱ्यांच्या वेशात लपलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या शोधात आहेत. पण जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे आणि कोणतंच अधिकृत कनेक्शन देखील समोर आलेलं नाही.

 

एक मुहावरा है कि घर की लंका भेदी ढाहे
धुरंधर टू आने की वजह से पाकिस्तान में में डर का माहौल बना हुआ है
पाकिस्तान के जितने भिखारी हैं उनको पकड़ कर पूछताछ किया जा रहा है
कि भिखारी भारत का raw एजेंट तो नहीं हैं
यह मूवी बेसक मनोरंजन के लिए बना हुआ है लेकिन इससे भारत को भी नुकसान… pic.twitter.com/N1lhNTo2bY

— premprakash (@pp73030711) March 25, 2026

 

सोशल मीडियावर भिकाऱ्यांना पकडून नेत असल्याचे अनेक व्गिडीओ व्हायरल होत आहेत. पण भारतात व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं कारण ‘धुरंधर’ सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकताच सोशल मीडिायावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दावा करण्यात आला की, सिनेमाच्या यशानंतर पाकिस्तानातील पोलीस कराची येथील गल्ल्यांमध्ये ‘हमजा अली’ याच्या शोधात आहेत.

सर्च ऑपरेशन 2025 पासून सुरु आहे…

रिपोर्टनुसार, पाकिस्ताना भिकाऱ्यांविरोधात सर्च ऑपरेशन 2025 पासून सुरु आहे. पोलीस आणि एजेन्स रस्त्यांपासून विमानतळांपर्यंत कारवाई करत आहेत, जवळपास 66 हजार लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, हजारो पासपोर्ट निलंबित करण्यात आलेत आणि अनेकांना आखाती देशांमधून हद्दपार करण्यात आलं आहे.

 

#Dhurandhar2‌ की इतनी दहशत कि पाकिस्तानी पुलिस बुर्का पहनकर हिंदुस्तानी जासूस ढूंढ रही है🤪🤣#Dhurandhar2‌TheRevenge#WestAsia #viral#9YearsOfGaribKalyan#Operation_SearchLight #9YearsOfGaribKalyan #Congress_Vulture_Politics pic.twitter.com/H4oRYE6nPy

— अनिल भारद्वाज (@Anil000789) March 25, 2026

 

तपासात असं देखील उघड झालंय की, या भिकाऱ्यांच्या मागे संघटित नेटवर्क कार्यरत होतं, ज्यात पैशासाठी मुले आणि महिलांचे शोषण करणाऱ्या टोळ्यांचा समावेश होता. काही प्रकरणांमध्ये, यांचा संबंध चोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी देखील जोडला गेलेला.

सरकारच्या म्हणण्यानुसार, या सर्च ऑपरेशनचा उद्देश शहरं भिकारीमुक्त करणं, मानवी तस्करीला आळा घालणं आणि देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारणं हा आहे. या कारवाईचे लक्ष्य आता टोळ्यांवर आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सेफ सिटी कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या नेटवर्कचा मागोवा घेतला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, गरिबी आणि बेरोजगारी हे या समस्येचे मूळ आहे, त्यामुळे केवळ अटकच नव्हे, तर पुनर्वसनही आवश्यक आहे.. असं देखील सांगण्यात येत आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in