• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar : चाहत्यांच्या तक्रारी येताच नेटफ्लिक्सने ‘धुरंधर’मध्ये केला मोठा बदल

February 2, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवल्यानंतर ‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होताच अवघ्या 24 तासांत हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला. परंतु ‘धुरंधर’च्या ओटीटी व्हर्जनने प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा केली. याचं पहिलं कारण म्हणजे थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपटाचा रन-टाइम 9 ते 10 मिनिटांनी कमी करण्यात आला आहे. दुसरं कारण म्हणजे ओटीटीवरील चित्रपटाची प्रिंट. डेटा कमी करण्यासाठी नेटफ्लिक्सने जी प्रिंट ओटीटीवर अपलोड केली आहे, ती धूसर आणि निस्तेज असल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. साऊंड आणि कलर ग्रेंडिंगबद्दलही काही तक्रारी समोर आल्या आहेत. या सर्व तक्रारींचा गंभीर विचार करत आता नेटफ्लिक्सने त्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

30 जानेवारी रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला, परंतु त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यात सुरुवात केली. प्रेक्षकांच्या तक्रारी वाढल्यानंतर अखेर नेटफ्लिक्स आणि निर्मात्यांनी ओटीटी व्हर्जनला अपग्रेड केलं आहे. ज्या प्रेक्षकांनी रविवारी हा चित्रपट पाहिला, त्यांनी सांगितलं की निर्मात्यांनी या चित्रपटाचे बिटरेट्स हाय केले आहेत. यामुळे चित्रपटाच्या क्वालिटीवर फार चांगला परिणाम झाला आहे. शिवाय कलर ग्रेडिंगसुद्धा सुधारण्यात आली आहे.

‘धुरंधर’चा थिएटरमधील रनटाइम 3 तास 34 मिनिटांचा असून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट फक्त 3 तास 25 मिनिटांचा आहे. डेटा कमी करण्यासाठी ओटीटीवर कधीकधी चित्रपट कंप्रेस केला जातो, यामुळे काही मिनिटांचा त्यात फरक पडतो. ‘धुरंधर’च्या बाबतीतही हेच झाल्याचा अंदाच व्यक्त केला जात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या तीन आठवड्यांतच कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला होता. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

‘धुरंधर’चा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागात रणवीर सिंहने गुप्तहेर हमजाची भूमिका साकारली आहे. तर रणवीरसोबतच या चित्रपटात अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. रणवीरसोबतच अक्षय खन्नाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष राज्य केलंय. पहिल्या भागाच्या तुफान यशानंतर आता प्रेक्षकांमध्ये ‘धुरंधर’च्या सीक्वेलविषयी प्रचंड उत्सुकता आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने
  • घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?
  • Sanjay Raut : विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
  • दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला?, अजितदादांच्या मृत्यूवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
  • Grammy Awards 2026 : भारताशी संबंधित या दिग्गज व्यक्तीने पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in