• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan: इयत्ता 3 रीपासूनच AI चा धडा! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा, अपडेट वाचली का?

April 2, 2026 by admin Leave a Comment


Union Education Minister Dharmendra Pradhan: देशात आता इयत्ता 3 रीपासूनच विद्यार्थी AI आणि Computational Thinking चे धडे गिरवतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयीच्या अभ्यासक्रमाचे काल उद्धघाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम लाँच करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने(NCERT) विकसीत आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शाळांमधील अभ्यासक्रम, तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत डिजिटल क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल.

जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी सरकार आग्रही

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलताना भारत सरकार देशातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले. त्यांनी अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाविषयक ज्ञान देण्याचा सरकाराच संकल्प असल्याचे म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सरकारने दोन मोठे उद्दिष्ट ठेवल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले. शिक्षणात AI आणि शिक्षणासाठी AI असे केंद्राचे दोन उद्देश आहेत. ते साध्य करण्यासाठी 2026-27 मोठी योजना आखण्यात आली आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सीईबीएसई अभ्यासक्रम विशेष समितीच्या माध्यमातून एआय आणि कम्प्युटेशनल थिकिंगसाठी धडे तयार करण्यात आले आहेत. इयत्ता 3 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यापक अभ्यासक्रम आता समोर आणण्यात आला आहे.

#WATCH | दिल्ली: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ने कहा, “भारत सरकार ने हमारे देश के स्कूली बच्चों को विश्व-स्तरीय, अत्याधुनिक ज्ञान देने का संकल्प लिया है। इस संबंध में विशेष रूप से आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) के मामले में हमने पहले ही 2026-27 तक दो मुख्य लक्ष्यों ‘शिक्षा में… pic.twitter.com/O5I9J3d6fp

— ANI_HindiNews (@AHindinews) April 1, 2026

भारत होणार एआय सुपर हब

भारताला लवकरच एआय सुपर हब तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी नवीन पिढी घडवण्याचे काम सुरू असल्याचा दावा प्रधान यांनी केला. जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचवण्यासाठी आता नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. जागतिक नवीन आव्हानं पेलण्यासाठी इयत्ता 3 रीपासूनच AI आणि Computational Thinking अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ही एक शैक्षणिक क्रांती असल्याचे ते म्हणाले. या अभ्यासक्रमामुळे भारताची जागतिक स्तरावर डिजिटल ओळख अजून मजबूत होईल असे प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. प्रधान यांनी याविषयीचे एक ट्विट करत या नवीन अभ्यासक्रमाची आणि भारताच्या नवीन एआय अभ्यासक्रमाची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी दोन उद्दिष्ट स्पष्ट केली आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन महिन्यानंतरच एआयची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याशिवाय संगणकीय विचार प्रणाालीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?
  • IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in