
बारामती विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधत उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली. यावेळी पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पातळीवरून या दिशेने हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील गहिनीनाथ गड येथे माध्यमांशी संवाद साधताना बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांबाबत भाष्य केले. “प्राजक्त तनपुरे हे चांगले नेते आहेत. त्यांच्या कामगिरीचा विचार करून त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती आणि त्यांनी ती मान्य केली, याचा आनंद आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
Leave a Reply