• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Delnaaz Irani : लग्न, घटस्फोट, पोटगी आणि…, अनेक वर्षांनंतर खासगी आयुष्यावर अभिनेत्री स्पष्टच बोलली

April 11, 2026 by admin Leave a Comment


Delnaaz Irani on Divorce Alimony : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा स्टारर ‘ कल हो ना हो’ सिनेमातून स्वीटू म्हणून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री डेलनाज इराणी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण डेलनाज आता तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत डेलनाज हिने लग्न, घटस्फोट आणि पोटगीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे… एवढंच नाही तर, आयुष्यात काही निर्णय फार कठीण असतात असं देखील डेलनाज म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त डेलनाज हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

खासगी आयुष्यावर डेलनाज म्हणाली, ‘नातं लगेचच आणि अचानक संपलं नसून, हळू हळू आमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागलेला… एक वेळ तर अशी आली जेव्हा मी मानसिक आणि भावनात्मक रित्या नात्यातून बाहेर पडली… जेव्हा एकाच घरात दोन लोकं राहतात आणि एकाच छताखाली राहून देखील अनोखळ्या व्यक्तींप्रमाणे राहच असतील, तर आपणच समजून जायचं की, नातं संपलेलं आहे… नात्यात सर्वात मोठी चूक एकच असते आणि ती म्हणजे एकमेकांना आदर न देणं…’, डेलनाज आणि पूर्व पती राजीव पॉल यांनी एकमेकांना वेळ देखील दिला… पण त्याचा देखील काहीही उपयोग झाला नाही..

पोटगीबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘घटस्फोटानंतर मी त्याच्याकडून एक रुपया देखील घेतला नाही… एवंढच नाही तर, माझा जो हक्क होता तो देखील मी सोडून दिला… मला माझ्या आयुष्यात फक्त शांती हवी होती… पण घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

घटस्फोटनंतर लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहते अभिनेत्री…

डेलनाज इराणी हिच्या कुटुंबियांबद्दल सांगायचं झालं तर, ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. जेथे घटस्फोट फार मोठी गोष्ट आहे. वैवाहिक आयुष्याला अधिक महत्त्व देणं… अशीच त्यांच्या कुटुंबात परंपरा आहे… त्यामुळे घटस्फोटाचा निर्णय अभिनेत्रीसाठी फार कठीण होता… अभिनेत्रीने कुटुंबियांच्या विरोधात जात नॉन – पारसी मुलासोबत लग्न केलं आणि घटस्फोट घेतला…

आज डेलनाज इराणी तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात नव्या पुरुषाची एन्ट्री झाली असून, दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.. डेलनाज इराणी हिचं पहिलं लग्न 1998 मध्ये झालं होतं. पण लग्नाच्या 14 वर्षांनंतर म्हणजे 2012 मध्ये डेलनाज इराणी आणि राजीव पॉल विभक्त झाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम
  • Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप
  • वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
  • US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…
  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in