• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DC vs MI: जसप्रीत बुमराह नवी दिल्लीत धमाक्यासाठी सज्ज, ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

April 3, 2026 by admin Leave a Comment


मुंबई इंडियन्सने 29 मार्चला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन 14 वर्षांचा वनवास संपवला. मुंबईने या विजयासह 2012 नंतर पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. आता मुंबई आपल्या मोहिमेतील दुसरा सामना शनिवारी 4 एप्रिलला खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दिल्ली विरुद्ध खास कामगिरी करण्याची संधी आहे.

बुमराहला आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज होण्याची संधी आहे. सध्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत माजी ऑलराउंडर ड्वेन ब्राव्हो आणि जसप्रीत बुमराह दोघेही संयुक्तरित्या दुसर्‍या स्थानी आहेत. ब्राव्होला मागे टाकण्यासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे.

भुवनेश्वर कुमार पहिल्या स्थानी

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा भुवनेश्वर कुमार याच्या नावावर आहे. भुवीला पछाडण्यासाठी बुमराहला अजून बरेच विकेट्स घ्यावे लागणार आहेत. मात्र त्याआधी बुमराहचा ब्राव्होला मागे टाकण्याचा प्रयत्न असणार आहे.

भुवीने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतील 191 सामन्यांमध्ये अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. भुवीने या 191 सामन्यांत 199 विकेट्स मिळवल्या आहेत. भुवीलाही विकेट्सच्या द्विशतकासाठी 1 विकेटची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला बुमराहही दिल्ली विरुद्ध किमान 1 विकेट घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे बुमराह दिल्ली विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज

हर्षल पटेल : 151 विकेट्स
लसिथ मलिंगा : 170 विकेट्स
जसप्रीत बुमराह : 183 विकेट्स
ड्वेन ब्राव्हो : 183 विकेट्स
भुवनेश्वर कुमार : 199 विकेट्स

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याची आयपीएल कारकीर्द

दरम्यान जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचंच प्रतिनिधित्व केलं आहे. बुमराहने आतापर्यंत 146 सामन्यांत मुंबईसाठी 183 विकेट्स मिळवल्या आहेत. बुमराहने या दरम्यान 2 वेळा 5 तर 3 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: गुजरात टायटन्सच्या पहिल्या विजयावर विरजन, कर्णधार शुबमन गिलला बसला मोठा फटका
  • ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचे बाबा खलनायकानंतर बनणार सज्जन ‘पुरुषोत्तम’
  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in