• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DC vs GT : येडा रे येडा, मिलरच्या चुकीमुळे दिल्लीने जिंकलेला सामना गमावला, गुजरातचा 1 रनने सनसनाटी विजय

April 8, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 14 व्या सामन्याचा विजेता संघ शेवटच्या चेंडूवर ठरला आहे. गुजरात टायटन्सने अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर 1 रनने सनसनाटी विजय मिळवला आहे. गुजरातने यासह विजयाचं खात उघडत दिल्लीला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. गुजरातने दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने या धावांचा अप्रतिम पाठलाग केला. त्यामुळे दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. मात्र प्रसिध कृष्णा याने हुशारीने बॉल टाकला. डेव्हीड मिलर याने या शेवटच्या चेंडूवर बॉल हुकल्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातचा विकेटकीपर जोस बटलर याने स्ट्राईकवर हुशारीने कुलदीप यादव याला रन आऊट केलं. यासह गुजरातने 1 रनने सनसनाटी विजय मिळवला. त्याआधी 20 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मिलरने 1 धाव घेण्यासह नकार दिला. मिलरने ती 1 धाव घेतली असती तर किमान सामना बरोबरीत सुटला असता. मात्र मिलरचा एकेरी धाव न घेण्याचा निर्णय चुकीचा ठरला. परिणामी दिल्लीला 1 धावेने सामना गमवावा लागला. दिल्लीने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 209 धावा केल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार
  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ
  • विमानात अचानक मृत्यू झाल्यास काय असतात नियम? इमर्जन्सी लँडिंग करता येते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in