• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

David Warner Arrested: डेविड वॉर्नरला अटक! PSL 2026 स्पर्धेदरम्यान घडलं असं काही…

April 8, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. खरं तर या स्पर्धेत वादग्रस्त तेवढंच होताना दिसत आहे. रोज काही ना काही वाद होत आहेत. त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा आहे वादाची स्पर्धा हे सांगणं कठीण आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने याने ही स्पर्धा सुरू असताना वाद निर्माण केला आहे. कायम मैदानात प्रतिस्पर्धी किंवा आपल्या संघातील खेळाडूंशी वाद करताना पाहिला आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात डेविड वॉर्नर मोइन अलीसोबत वाद घालत होता. पण त्यानंतर सारवासारव करत तसं काही झालंच नाही असं सांगितलं गेलं. पण असं असताना डेविड वॉर्नर मैदानाबाहेर पुन्हा एकदा वादात अडकला आहे. त्याने केलेल्या चुकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इतकंच काय तर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आयपीएल स्पर्धेतून डावलल्यानंतर डेविड वॉर्नरने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत कराची किंग्स संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. डेविड वॉर्नरला अटक झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय केलं असा प्रश्न अनेकांना पडला. तर दारूच्या नशेत गाडी चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. स्पर्धेत तीन सामन्यांचा खेळ संपल्यानंतर डेविड वॉर्नरने एक छोटासा ब्रेक घेतला होता. 3 एप्रिलला ऑस्ट्रेलियाला परतला. पण या ब्रेक दरम्यान त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

वॉर्नरने परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान केल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 0.104 इतकं नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातील कायदेशीर मर्यादेच्या दुप्पट आहे. या प्रकरणी वॉर्नरवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. वॉर्नरला पुढील महिन्यात न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • KKR vs PBKS: एक पॉइंट दिला..! श्रेयस अय्यरच्या बहिणीने शाहरूख खानच्या संघाची उडवली खिल्ली
  • सलमान खानच्या हिरोइनवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईच्या निधनाने पूर्णपणे खचली
  • कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर
  • Weather Updates : अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट
  • झटपट वजन कमी करण्यासाठी हे 5 लोकप्रिय डाएट आहेत उत्तम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in