
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली. सीएसकेला पहिल्याच सामन्यात पहिल्या मोसमातील उपविजेता राजस्थान रॉयल्सकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता चेन्नई आपल्या मोहिमेतील दुसरा सामना हा 3 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईचं होम ग्राउंड असलेल्या एमए चिंदबरम स्टेडियममध्ये होणार आहे. चेन्नई पहिल्या पराभवानंतर पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. या निमित्ताने चेन्नईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
Leave a Reply