
पंजाब किंग्स टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात सलग दुसरा विजय मिळवला आहे. पंजाबने होम टीम चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात 5 विकेट्सने लोळवलं. चेन्नईने पंजाबसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. पंजाबने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून विजयी आव्हान गाठलं. पंजाबसाठी पहिल्या 6 फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र कॅप्टन श्रेयस अय्यर आणि ओपनर प्रभसिमरन सिंह या दोघांनी पंजाबच्या विजयात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. तसेच इतरांनीही हातभार लावला.
Leave a Reply