• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricketers Who Changed Their Religion: धर्म बदलणारे 5 दिग्गज क्रिकेटर, यात एक भारताचाही प्लेयर

March 17, 2026 by admin Leave a Comment


Five Cricketers Who Changed Their Religion: क्रिकेट विश्वात असे काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी स्वतःचा धर्म बदलला आहे. अनेकांनी वैयक्तिक विश्वास, कोणी आई – वडिलांचा घटस्फोटानंतर स्वतःचा धर्म बदलला. एका क्रिकेपटूने तर लग्नानंतर बायकोचा धर्म स्वीकारला. काही क्रिकेटपटूंच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. यामध्ये भारताचे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचं देखील नाव आहे.. शिवाय पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ याचं देखील नाव सामिल आहे… ज्यांनी स्वतःचा धर्म बदलला… आज अशा 5 दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी आपला धर्म बदलला आणि आजही ते त्याच धर्मावर श्रद्धा ठेवून आपलं जीवन जगत आहेत.

5 दिग्गज क्रिकेटर ज्यांनी बदलला स्वतःचा धर्म

1. मोहम्मद यूसुफ – पाकिस्तान

यादीत सर्वात पहिलं नाव दिग्गज पाकिस्तानी फलंदाज युसूफ युहाना याचं आहे. युसूफचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. मात्र, 2005 मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून मोहम्मद युसूफ असं ठेवलं. 2006 मध्ये, त्याने कसोटी क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (1788 धावा) करण्याचा ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला.

2 . विनोद कांबळी – भारत

भारताने पूर्व क्रिकेटर विनोद कांबळी त्यांच्या धर्मांतरानंतर चर्चेत आलेले… कांबळी यांचा जन्म हिंदू धर्मात झालेला. पण त्यांनी जेव्हा ख्रिश्चन गर्लफ्रेंड एंड्रिया हिच्यासोबत लग्न केलं, तेव्हा कांबळी यांनी देखील ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला. एंड्रिया आणि विनोद यांना एका मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव जीझस क्रिस्टियानो असं आहे. कांबळी यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, ते सर्व धर्मांचा आदर करतात, परंतु पत्नीच्या श्रद्धेचे पालन करण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माची निवड केली.

3. तिलकरत्ने दिलशान – श्रीलंका

श्रीलंकेचे महान सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशान याचा जन्म तुवान मोहम्मद दिलशान या नावाने एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्याचे वडील मुस्लिम आणि आई बौद्ध होती. पण आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर तिलकरत्ने याने इस्लाम धर्माचा त्याग करत बैद्ध धर्म स्वीकारला… त्यानंतर क्रिकेटपटूने स्वतःचं नाव बदललं आणि तिलकरत्ने मुदियानसेलागे दिलशान ठेवलं.

4. वेन पार्नेल – दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू वेन पार्नेल (Wayne Parnell) याने 2011 मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार केला. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याने स्वतःचं नाव बदललं आणि वलीद ठेवलं… पण क्रिकेट विश्वात आजही त्याला ‘वेन पार्नेल’ नावानेच ओळखलं जातं… धर्मांतरानंतर, पार्नेलने स्पष्ट केलं होतं की, त्याचा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक होता आणि त्याने त्यावर बराच काळ अभ्यास केलेला.

5. सूरज रणदीव – श्रीलंका

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज सूरज रणदिव यानेही इस्लाम धर्म स्वीकारला. मोहम्मद मार्शूक मोहम्मद सूरज या नावाने जन्मलेला रणदिव हा मुस्लिम होता. पण मुस्लीम धर्माचा त्याग करत त्याने हिंदू धर्म स्वीकारलेला… त्यानंतर त्याने स्वतःचं नाव सूरज रणदीव ठेवलं… सध्या तो ऑस्ट्रेलिया येथे राहतो आणि तेथेच स्थायिक झाला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in