• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket Pension : क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, या माजी खेळाडूंनाही पेन्शन, दर महिन्याला किती मिळणार?

April 2, 2026 by admin Leave a Comment

भारताता आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना केएससीए अर्थात कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटला प्रोत्साहान देण्यासाठी ऐतिहासिक पाऊस उचललं आहे. केएससीएने बुधवारी 1 एप्रिल रोजी
कर्नाटक सीनिअर वुमन्स टीमचं नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंना दरमहा निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे माजी महिला खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. या माजी महिला खेळाडूंना क्रिकेट बोर्डाकडून पेन्शन म्हणून किती रक्कम मिळणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पेन्शन मिळणार मात्र अटी काय?

केएससीएकडून सरसकट सर्वच माजी महिला खेळाडूंना पेन्शन मिळणार नाहीय. या पेन्शनसाठीही क्रिकेट बोर्डाच्या काही अटी आहेत. पेन्शनसाठी पात्र ठरणाऱ्या माजी खेळाडूंचं वय हे किमान 55 किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं. तसेच बीसीसीआयकडून पेन्शन मिळत असल्यास संबंधित माजी महिला खेळाडूला केएससीएच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच या माजी खेळाडूंना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी राज्य क्रिकेट संघाचं किती सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय? याची पुराव्यासह माहिती द्यावी लागेल.

पेन्शन देण्यामागील हेतू काय?

“राज्याचं प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंच्या कामगिरीची दखल आणि त्यांचं योग्य सन्मान हा या योजनेमागील हेतू असल्याचा केएससीएचे सचिव संतोष मेनन यांनी म्हटलं. तसेच हा निर्णय आजी महिला खेळाडूंना प्रोत्साहित करणारा आहे. कर्नाटकासाठी खेळलेल्या अनेक खेळाडूंनी आतापर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये सध्या श्रेयांका पाटील आणि राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे.

बीसीसीआयकडून महिला खेळाडूंना किती पेन्शन?

दरम्यान बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयकडून पुरुषांप्रमाणे माजी महिला क्रिकेटपटूंनाही पेन्शन देण्यात येते. माजी महिला क्रिकेटपटूने भारताचं किती सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय? यावर पेन्शनची रक्कम निश्चित होते. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

केएससीएचा मोठा निर्णय

KSCA announces Monthly Gratis (pension) for former women cricketers who have represented Karnataka in Snekor Women’s National C’ship. @Xpress_Sports pic.twitter.com/KE6RGP0Orf

— Chandra Prabhu (@chandraposts) April 1, 2026

बीसीसीआयकडून जून 2022 नंतर निवृत्त झालेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंना दरमहा 52 हजार 500 रुपये पेन्शन दिली जाते. तसेच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या आणि 2003 आधी निवृत्त झालेल्या खेळाडूंना दरमहा 45 हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं. तसेच भारताचं 25 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या आणि 1993 आधी निवृत्त झालेल्या खेळाडूंना दर महिन्याला 70 हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?
  • IPL 2026: डेविड मिलर नाही तर आयपीएलमधील हा नियम दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं कारण ठरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in