• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket : वर्ल्ड कप फायनलमधील कर्णधार एकत्र खेळणार, तारीखही ठरली, सामना कधी?

March 11, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसामातील (IPL 2026) पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2926 स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचा रनसंग्राम पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धा देशातील विविध शहरांत खेळवण्यात येते. त्यामुळे आयोजक बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा, स्थानिक पोलिसांची परवानगी यासारख्या अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. आयपीएल स्पर्धेचं आयोजन मार्चमधील शेवटचा आठवडा ते 26 मे दरम्यान करण्यात येतं. मात्र यंदा या दरम्यान एकूण 4 राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यंदा बीसीसीआयकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.

पहिल्या टप्प्यात 20 सामने आणि 4 हेडर

निवडणुकांचा विचार करता बीसीसीआयने फक्त पहिल्या 20 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या 15 दिवसांत एकूण 20 सामने होणार आहेत. या दरम्यान 4 डबल हेडरचा थरार रंगणार आहे. आयपीएल निमित्ताने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप अंतिम सामन्यातील कर्णधार एकत्र खेळताना दिसणार आहेत. टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी 8 मार्च रोजी टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केलं. टीम इंडियाने यासह टी 20I वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. विशेष म्हणजे सूर्याने या स्पर्धेत कर्णधार म्हणून पदार्पणातच भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. तर मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.

सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर एकत्र खेळणार

सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर 8 मार्च रोजी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरले होते. मात्र आता आयपीएलच्या 19 व्या मोसमात सँटनर आणि सूर्या सहकारी म्हणून खेळताना दिसणार आहेत. दोघेही आयपीएलमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. सँटनर बॉलिंग ऑलराउंडर आहे. तर सूर्या पलटणचा प्रमुख भिडू आहे.

मुंबई इंडियन्स टीमचा पहिला सामना कधी?

दरम्यान मुंबई इंडियन्सचा 19 व्या मोसमातील पहिला सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात. मुंबईचा या मोसमातील सलामीचा सामना पहिल्याच दिवशी 29 मार्चला होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात कोलकाता नाईट्स रायडर्स टीमचं आव्हान असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in