• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर बोर्डाचा मोठा गेम, एका मालिकेसाठी 2 कर्णधार, टीम जाहीर, सीरिज कधीपासून?

March 11, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा 1 महिन्याने थरार पार पडला. क्रिकेट चाहत्यांना महिन्याभरात एकसेएक सामने पाहायला मिळाले. यजमान टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 256 रन्सचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 159 धावांवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात 96 धावांनी विजय मिळवला. भारताची ही वर्ल्ड कप जिंकण्याची सलग दुसरी तर एकूण तिसरी वेळ ठरली. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.

1 मालिका आणि 2 कर्णधार

न्यूझीलंड या टी 20i मालिकेत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 5 टी 20i सामने खेळणार आहे. उभयसंघात 15 ते 25 मार्च दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ आयसीसी टी 20i वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर आमनेसामने येणार आहे. न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला होता.

वर्ल्ड कप फायनलनंतर उपविजेता न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात टी 20i मालिकेसाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंड निवड समितीने या मालिकेसाठी 2 कर्णधारांची निवड केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिलीच मालिका असल्याने निवड समितीने काही खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती दिली आहे. तर काही खेळाडूंना मोजक्यात सामन्यांत संधी दिली आहे. त्यामुळे काही युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

मिचेल सँटनरकडे नेतृत्व

मिचेल सँटनर न्यूझीलंडचं पहिल्या 3 सामन्यांत नेतृत्व करणार आहे. सँटनरसह पहिल्या 3 सामन्यानंतर बहुतांश खेळाडू मुक्त होणार आहे. त्यानंतर टॉम लॅथम उर्वरित 2 सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. कायल जेमीसन, कॉल मॅककॉन्ची,जिमी निशाम, बेन सियर्स आणि इश सोढी हे 5 खेळाडू संपूर्ण मालिकेचा भाग असणार आहेत.

7 खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटनुसार विश्रांती

न्यूझीलंड निवड समितीने 7 खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटनुसार या टी 20i मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. या 7 खेळाडूंमध्ये फिन एलन, मार्क चॅपमॅन, जेकब डफी, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि टीम सायफर्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे 3 खेळाडूंना पहिल्यांदा टी 20i संघात संधी मिळाली आहे. या तिघांमध्ये केटीन क्लार्क, निक केली आणि जेडन लेनोक्स यांचा समावेश आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 15 मार्च, माऊंट मौंगानुई, बे ओव्हल.

दुसरा सामना, 17 मार्च, सिडन पार्क, हॅमिल्टन.

तिसरा सामना, 20 मार्च, ऑकलंड, एडन पार्क.

चौथा सामना, 22 मार्च, वेलिंग्टन, स्काय स्टेडियम.

पाचवा सामना, 25 मार्च, ख्राईस्टचर्च.

मिचेल सँटनर (कर्णधार) (पहिल्या 3 सामन्यांसाठी), केटेन क्लार्क (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), जोश क्लार्कसन, डेन क्लीवर (विकेटकीपर) (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), डेवोन कॉन्वे (विकेटकीपर) (पहिल्या 3 सामन्यांसाठी), लॉकी फर्ग्यूसन (दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी), जॅक फोक्स, बेवन जेकब्स, कायल जॅमिसन, निक केली, टॉम लॅथम (कर्णधार-विकेटकीपर, शेवटच्या 2 सामन्यांसाठी), जेडन लेनोक्स (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), कोल मॅक कॉन्ची, जिमी निशम, टिम रॉबिन्सन, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ आणि इश सोढी.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in