• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर आता टी 20I मालिकेचा थरार, टीम सज्ज, पहिला सामना कधी?

March 13, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीम जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. न्यूझीलंडने भारताचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव केला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला टी 20i सीरिजमध्ये 4-1 ने पराभूत केलं. या द्विपश्रीय मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले. मात्र भारताने न्यूझीलंडचा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये परानभव केला. त्यामुळे न्यूझीलंडचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यंदाही अधुर राहिलं. टीम इंडिया विश्वविजेता ठरली. तर न्यूझीलंडला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागंल आहे.

न्यूझीलंड मायदेशीत परतताच आता 15 मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. हा सामना रविवारी 15 मार्चला होणार आहे. या निमित्ताने दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड टी 20i वर्ल्ड कप 2026 सेमी फायनलनंतर आमनेसामने येणार आहेत. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा या मालिकेत न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in