• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Colourful Holi: या देशात धुळवड नाहीच, रंग खेळला तर थेट तुरूंगवास

February 28, 2026 by admin Leave a Comment


Colourful Holi: होळी, धुळवड, रंगपंचमी हा भारतीय समाजाचा एक महत्त्वपूर्ण रंग आहे. या सणात आनंद आहे. दुख विसरून, नात्यातील दुरावा विसरून, अपमान विसरून एकत्र येण्याची शिकवण मिळते. एकमेकांना रंग लावत आनंद साजरा करण्यात येतो. घराघरात, मैदानात, गल्लीत रंगपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी धुळवडीला मिरवणूक काढली जाते. देवाला रंग लावल्या जातो. मिठाई वाटली जाते. पण काही देशात, खासकरून मुस्लिम देशात होळी साजरी होत नाही. रंगपंचमी, धुळवड खेळल्यास इथं थेट तुरुंगवास होऊ शकतो. कोणते आहेत हे देश?

अनेक इस्लामिक देशांमध्ये धार्मिक आणि सामाजिक नियम अत्यंत कडक आहेत. इथं धुळवड ही सार्वजनिकरित्या साजरी करणे जवळपास अशक्य आहे. काही ठिकाणी तर रंगांच्या उधळणीवर पूर्णपणे बंदी आहे. या देशात सार्वजनिक स्तरावर धुळवड साजरी करता येत नाही. जर कोणी या देशातील धार्मिक नियम मोडले तर अशा व्यक्तीला कडक शिक्षा, कठोर शिक्षा होऊ शकते.

या देशात नाही खेळत होळी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आहे. इथं धार्मिक नियम अत्यंत कडक आहेत. हिंदू आणि शिखांची इथं संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे. इथं होळी सार्वजनिक पद्धतीने साजरी होत नाही. इथं रंग खेळणे आणि मिरवणूक काढण्यास सक्त मनाई आहे. हा सण मंदिर अथवा घरातच खेळला जाऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अथवा मैदानात रंगपंचमी साजरी करता येऊ शकत नाही. जर कोणी हा प्रयत्न केला तर कडक शिक्षा होते.

यासह सौदी अरब या देशातही होळी, धुळवड साजरी होऊ शकत नाही. भारतीय प्रवासी हे दुतावासात अथवा खासगी जागेत होळी साजरी करू शकतात. तर कतार आणि ओमान या देशात धार्मिक नियम कडक असले तरी भारतीयांना त्यांच्या मंदिरात, जागेत हा सण साजरा करता येतो. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास मनाई आहे. या देशात प्रशासनाच्या परवानगीशिवाय हा सण साजरा केल्यास दंड, कायदेशीर कारवाई अथवा थेट तुरुंगवास घडू शकतो.

रंग दिसल्यास कडक शिक्षा

तर काही इस्लामिक देशात होळी साजरी करणे, रंग खेळणे हा कायदेशीर गुन्हा मानल्या जातो. त्यासाठी कडक शिक्षा आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार शिक्षा होऊ शकते. अनेक मुस्लिम देशात सार्वजनिक रित्या हिंदू सण वा उत्सव साजरा करण्यास मनाई आहे. हा नियम तोडल्यास कडक शिक्षा होऊ शकते. काही ठिकाणी चाबकाचे फटके पण बसू शकतात. अर्थात हे तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in