• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chickens Neck : ईशान्य भारताला आपल्यापासून तोडण्याचा चीन-बांग्लादेशचा डाव उधळण्यासाठी भारताचं एकदम परफेक्ट प्लानिंग

February 9, 2026 by admin Leave a Comment


चिकन्स नेक म्हणजे सिलीगुडी कॉरिडोर भारतासाठी खूप महत्वाचा आहे. चिकन्स नेक हा जमिनीचा एक पातळ असा पट्टा आहे. रणनितीक दृष्टीने भारतासाठी हा पट्टा खूप महत्वाचा आहे. कारण याच चिकन्स नेकमुळे भारताची ईशान्येकडची राज्य मुख्य भूमीशी जोडली जातात. हा चिकन्स नेक आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. त्यामुळे त्याचं महत्व जास्त आहे. बांग्लादेशात युनूस सरकारच्या काळात याच चिकन्स नेकवरुन बरीच वक्तव्य झाली आहेत. याच चिकन्स नेकवर चीनची नजर आहे. आता भारताने चिकन्स नेकच्या आसपास मूलभूत सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. एक अंडरग्राऊंड रेल्वे कॉरिडोर बनवण्याच्या प्लानचा खुलासा झाला आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रविवारी म्हणाले की, चिकन्स नेकचा उत्तर भाग बंगालमध्ये आहे. तिथे एक अंडरग्राऊंड रेल्वे कॉरिडोर सुद्धा बनवला जाणार आहे. जेणेकरुन आणीबाणीच्या प्रसंगात सुरक्षित ट्रान्सपोर्टेशन व्हावं. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे अंडरग्राउंड रेल्वे कॉरिडोर बनवणार आहे. प्रस्तावित अंडरग्राउंड लाइन टिन माइल हाट पासून रंगापानी आणि मग बागडोगरा पर्यंत जाईल.

अंडरग्राऊंड रेल्वे का?

अंडरग्राऊंड कॉरिडोरच्या हिशोबाने हा प्लान केलेला आहे. सिलीगुड़ी कॉरिडोरची सुरक्षितता आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय कनेक्टिविटी टिकून रहावी हा या रेल्वे कॉरिडोरमागे उद्देश आहे. नेपाळ, भूतान आणि बांग्लादेशची या देशांची आंतरराष्ट्रीय सीमा जवळ आहे. त्यामुळे सिक्योरिटीशी संबंधित अडचणी, नैसर्गिक संकटं याचा सामना करावा लागू नये, यासाठी अंडरग्राऊंड रेल्वे बनवण्यात आली आहे.

रणनितीक महत्व काय?

अंडरग्राऊंड रेल्वेमुळे दुसरा न दिसणारा सुरक्षित मार्ग तयार होईल. गरजेच्यावेळी सुरक्षादलाचे लोक, मिलिट्री सामान आणि इमर्जन्सी प्रसंगात कुठल्याही अडथळ्याशिवाय सामानाची ने-आण करता येईल. “हा प्रोजेक्ट बागडोगरा एअर फ़ोर्स स्टेशन आणि इंडियन आर्मीच्या 33 व्या कोर बेंगडुबी आर्मी कँटोनमेंट जवळ असल्याने एअर-रेल लॉजिस्टिक्सला सपोर्ट करेल” असं नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ कपिंजल किशोर शर्मा म्हणाले.

बांग्लादेशपासून फक्त 68 किलोमीटर अंतरावर

दार्जिलिंगच्या टिन मिल्ली हाट पासून रंगापानी पर्यंत एक अंडरग्राऊंड बोगदा रेल्वे बनवेल. या दोन स्टेशन्सची निवड का करण्यात आली? ते रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. टिन मिल्ली हाट दार्जिलिंग जिल्ह्यात आहे. सिलीगुडी पासून 10 किलोमीटर लांब आहे. त्याशिवाय बांग्लादेशच्या पंचगढपासून फक्त 68 किलोमीटर दूर आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं?
  • Maharashtra Weather Updates : आज दुपारी घरातच थांबा, 12 ते 4…, राज्यात आजपासून सुरू होणार उष्णतेचं टॉर्चर
  • इराणने मारली बाजी! ट्रम्प यांच्या एका पोस्टमुळे मोठे नुकसान, नेमकं काय घडलं?
  • Horoscope Today 12th April 2026 : रविवारी मिळणारी नशीबाची साथ, या 3 राशींना आज मिळणार तगडा फायदा, वाचा आजचं भविष्य
  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in