• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ChatGPT मोठा दावा, या वयोगटातील लोक करत आहेत सर्वात जास्त ChatGPT चा वापर

February 22, 2026 by admin Leave a Comment


भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा वापर झपाट्याने वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे OpenAI यांनी जाहीर केलेला ताजा अहवाल. या अहवालानुसार भारतातून पाठवले जाणारे जवळपास निम्मे ChatGPT संदेश 18 ते 24 वयोगटातील तरुणांकडून पाठवले जातात. एकूण पाहता, 30 वर्षांखालील वापरकर्ते सुमारे 80 टक्के अ‍ॅक्टिव्हिटी चालवत आहेत. त्यामुळे भारतातील तरुण पिढी AI साधनांचा वेगाने स्वीकार करत असल्याचे स्पष्ट होते.

OpenAI च्या माहितीनुसार, भारतातील ChatGPT चा सर्वात मोठा युजर बेस हा तरुणांचा आहे. 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते एकट्याने जवळपास 50 टक्के संदेश पाठवत आहेत. 30 वर्षांखालील वापरकर्त्यांचा एकत्रित वाटा सुमारे 80 टक्के आहे. हा ट्रेंड दर्शवतो की नवी पिढी शिक्षण, प्रोजेक्ट्स, नोकरी आणि वैयक्तिक कौशल्यविकासासाठी AI टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. कंपनीने भारताला वेगाने वाढणारा आणि महत्त्वाचा बाजार म्हणून ओळख दिली आहे.

कोणत्याकामासाठी होतोय वापर?

अहवालानुसार, भारतातून पाठवले जाणारे सुमारे 35 टक्के संदेश व्यावसायिक कामाशी संबंधित आहेत. जे जागतिक सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे. कंटेंट रायटिंग, रिसर्च, ऑफिस टास्क, डेटा विश्लेषण आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ChatGPT चा वापर वाढत आहे. याशिवाय सामान्य माहिती, मार्गदर्शन आणि लेखन सहाय्यासाठीही लोक AI चा आधार घेत आहेत. त्यामुळे AI आता केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनत आहे.

OpenAI ने विशेष नमूद केले आहे की भारतात त्यांचा कोडिंग असिस्टंट Codex जागतिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात वापरला जात आहे. अलीकडील आठवड्यांत त्याच्या साप्ताहिक वापरात मोठी वाढ झाली असून भारतीय वापरकर्ते कोडिंगसंबंधी अधिक प्रश्न विचारत आहेत.

भारतात विस्ताराची तयारी

OpenAI आता भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनी मुंबई आणि बेंगळुरू येथे नवीन कार्यालये सुरू करण्याच्या तयारीत असून टाटा ग्रुप सोबत भागीदारी करून AI कंप्यूटिंग क्षमता वाढवण्यावर काम करत आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या माध्यमातून ChatGPT एंटरप्राइज सेवा विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कंपनी Pine Labs, ixigo, MakeMyTrip आणि Eternal यांसारख्या कंपन्यांसोबतही सहकार्य करत आहे. येत्या काही वर्षांत एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत AI टूल्स पोहोचवण्याची कंपनीची योजना आहे.

खर्चात मोठी घट

OpenAI चे सीईओ Sam Altman यांनी सांगितले की गेल्या सुमारे 14 महिन्यांत AI मार्फत जटिल उत्तर मिळवण्याचा खर्च 1000 पटांहून अधिक कमी झाला आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना AI चा अधिकाधिक फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्याचं 35 व्या वर्षी निधन; गंभीर आजारानंतर सर्जरीला दिला नकार
  • ओटीटीवरील सर्वात जास्त IMDb रेटिंग असणारे हे 3 चित्रपट कधीच पत्नीसोबत पाहू नका, अन्यथा…
  • काजूकतली वाटेल फिकी, अशा पद्धतीने बनवा शेंगदाणा बर्फी, रेसिपी एकदा पाहाच
  • बनारस येथे वेश्याव्यवसाय करणारी प्रसिद्ध महिला, तिच्याशी संजय दत्तचे खास कनेक्शन, जाणून व्हाल अवाक्
  • IPL 2026 Orange Cap: एकही सामना जिंकला नाही पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 2 फलंदाज, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in