• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chandra Grahan 2026: होळीला की धुळवडीला नेमके केव्हा आहे वर्षाचे पहिले चंद्रग्रहण ? भारतातून दिसणार का ?

February 26, 2026 by admin Leave a Comment


Chandra Grahan 2026: खगोल विज्ञानात चंद्र ग्रहण एक विशेष घटना मानली जाते. ही घटना सुर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यानंतर घडते.यामुळे सुर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषशास्राच्या दृष्टीने देखील मोठे महत्व दिले जाते. ग्रहणाचा काळ धार्मिक मान्यतेनुसार अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेलाच चंद्रग्रहण लागत असते.

 

यावर्षी ३ मार्च रोजी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशि आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. हे वर्षातले सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण ३ तास २७ मिनिटांपर्यंत चालणार आहे. मात्र या चंद्रग्रहणाबाबत कन्फ्युजन आहे की होलिका दहन की रंगपंचमी नेमके केव्हा चंद्रग्रहण आहे. कारण फाल्गुण महिन्याची पौर्णिमा यंदा दोन दिवस आहे. आणि होळीचा सण दोन दिवस साजरा केला जातो. चला तर पाहूयात नेमके केव्हा लागणार आहे चंद्रग्रहण ते पाहूयात..

फाल्गुन पौर्णिमा 2026 कधी आहे ?

पंचांगानुसार, या वर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी २ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजून ५५ मिनिटांनी सुरु होईल. तर या तिथीची समाप्ती ०३ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजून ०७ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे यंदा फाल्गुन पौर्णिमा ३ मार्च रोजी होणार आहे.

होलिका दहनाला चंद्र ग्रहण

यंदा ३ मार्च २०२६ रोजी फाल्गुन पौर्णिमेला या वर्षातील पहिले खग्रास चंद्र ग्रहण (ब्लड मून) दिसणार आहे, जे भारतातूनही दिसणार आहे. ग्रहणाच्या मुळे होलिका दहनाच्या तारखेत कोणताही बदल केलेला नाही. ३ मार्च रोजी चंद्र ग्रहण दुपारी ३.२० वाजता ते सायंकाळी ६.४७ वाजेपर्यंत राहणार आहे. परंतू ग्रहण आणि भद्रा काळ ध्यानात घेता ३ मार्च रोजी सायंकाळी ६.४८ वाजता ते रात्री ८.५० वाजेपर्यंतचा काळ होलीका दहनासाठी योग्य राहणार आहे.

04 मार्च रोजी धुलीवंदन

या वर्षीचा रंगाचा सण धुलीवंदन म्हणजेच धुळवड ४ मार्च २०२६ खेळली जाणार आहे. कारण पंचांगानुसार रंगाचा हा सण चैत्र माहच्या कृ्ष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीच्या दिवशी खेळला जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला केवळ सोने- चांदीच नव्हे, तर ‘या’ वस्तू खरेदी करणेही शुभ
  • Pakistan: पाकिस्तानात पेटीएम-गुगल पे आणि फोन पे चालते का ? तेथे ऑनलाईन पेमेंट कसे होते ?
  • घरातील ‘या’ 5 गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका, गरिबीच्या दिशेने सुरु होईल वाटचाल
  • युद्धविरामानंतर इराणचा सर्वात मोठा धक्का; भारत मोठ्या संकटात, मित्र असूनही शत्रूसारखा वागला
  • डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in