• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : हे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, चाणक्यांच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवाच

March 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. जर तुम्ही संकटात आहात, तर त्यातून मार्ग कसा काढायचा? शत्रूचा पराभव कसा करायचा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण? आयुष्य कसं जगावं आणि कसं जगू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या समाजात असे काही लोक असतात जे आपल्या हातानेच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात, असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, त्यांचं मोठं नुकसान होतं. तसेच जो व्यक्ती आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करत नाही, हातात आलेल्या पैशांची उधळपट्टी करतो. ज्या लोकांना वाईट संगत असते, असे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी सांगितलेल्या त्या 10 गोष्टी.

अशा लोकांचं आयुष्य बर्बाद होतं – चाणक्य म्हणतात दुसऱ्याच्या घरात राहणारे लोक, मंत्री नसलेला राजा आणि नदीच्या काठी असलेली वृक्ष लवकरच नष्ट होतो.

अशा घरात पैसा कधीच टिकत नाही – चाणक्य म्हणतात ज्या घरात मूर्ख लोकांना अधिक किंमत दिली जाते, जेवणाच्या ताटात अन्न शिल्लक ठेवलं जातं, तसेच कुटुंबातील सदस्यांबद्दल जिव्हाळा नसतो, सारखी भांडणं होतात, अशा घरात कधीही पैसा टिकत नाही.

हे लोक कधीही उपाशी राहत नाही – चाणक्य म्हणतात जे लोक बुद्धिमान आहेत, ते लोक कधीही उपाशी राहत नाहीत. ते आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रत्येक समस्येचा उपाय शोधून काढतात.

असे लोक कायम दु:खी राहतात – चाणक्य म्हणतात जे गुरु मूर्ख शिष्यांना उपदेश देतात, ते गुरु कायम दु:खी राहतात. कारण अनेकदा असा शिष्ट त्यांच्या विद्येचा चुकीचा उपयोग करतो.

असे लोक कायम गरीब राहतात – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, कष्ट करत नाही ते आयुष्यभर गरीब राहतात.

असे आई-वडील आपल्या मुलांसाठी शत्रू असतात – आर्य चाणक्य यांच्या मते जे आई -वडील आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत नाहीत, त्यांच्यावर संस्कार करत नाहीत, असे आई -वडील आपल्या मुलांसाठी शत्रू असतात.

असे मित्र कायम तुम्हाला दु:ख देतात – चाणक्य म्हणतात मित्रता ही नेहमी तुमच्या बरोबरीच्या व्यक्तीसोबत केली पाहिजे, जर तुमचा मित्र हा खूप गरीब असेल किंवा खूप श्रीमंत असेल तर ती मैत्री तुम्हाला कायम दु:ख देते.

आदर – चाणक्य म्हणतात ज्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळत नाही, अशा ठिकाणी जाण्याची चूक कधीही करू नये.

हे 3 लोक तुमच्या सोबत असतील तर तुमचं आयुष्य व्यर्थ जातं – आर्य चाणक्य म्हणतात ज्याच्यासोबत रागीट बायको, विश्वासघातकी मित्र आणि कामचुकार नोकर असतात अशा लोकांचं आयुष्य व्यर्थ जातं.

धैर्य – चाणक्य म्हणतात परिस्थिती कशीही असो तुम्ही तुमचं धैर्य गमावू नका, शेवटी विजय तुमचाच आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in