• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

March 22, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई-वडील कसे असावेत, याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आदर्श आई -वडील कसे असावेत? त्यांनी मुलांवर कसे संस्कार करावेत? मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्यात? मुलांच्या गरज पूर्ण करताना काय काळजी घ्यावी?  याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. चाणक्य म्हणतात मुलं ही मातीचा गोळा असतात, ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्यांना आकार देतो, त्याचप्रमाणे आई-वडीलांवर आपल्या मुलांना आकार देण्याची जबाबदारी असते. ही जबाबदारी फार मोठी असते. कारण एखादा मुलगा जर चांगला सुसंस्कारी निघाला तर फक्त त्या कुटुंबाचीच प्रगती होते असं नाही, तर राज्याच्या प्रगतीला हातभार लागतो. कारण तरुण हे राज्याची साधन संपत्ती असतात.  मात्र जर एखादा मुलगा अवगुणी निघाला तर त्या अख्खा कुटुबाचं वाटोळ होतं. पण राज्यासाठी देखील ही गोष्ट हिताची नसते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य म्हणतात प्रत्येक आई-वडिलांच्या आपल्या मुलाप्रति काही जबाबदाऱ्या असतात. तुम्ही तुमच्या मुलांना संपत्ती तर द्याच, पण एकवेळ तुमच्याकडे संपत्ती नसेल तरी चालेल. पण मुलांना दोन गोष्टी या तुम्ही दिल्याच पाहिजे. ते तुमचं कर्तव्य आहे. एक तर शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कार. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात जर आई-वडिलांकडे मुलांना वारस हक्काने द्यायला संपत्ती नसेल तरी चालेल. पण जगातील कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना अशिक्षित ठेवू नये. त्याला उत्तम शिक्षण द्यावे, कारण याच शिक्षणाच्या भरोशावर तो प्रगती करू शकतो. त्याला नवी दिशा मिळते.

संस्कार – चाणक्य म्हणतात मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ही आई-वडिलांची असते. ज्या मुलांवर चांगले संस्कार होतात, त्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होतं. असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in