• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या लोकांना कधीच उसणे पैसे देऊ नका, बुडालेच म्हणून समजा

March 6, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत? आणि कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? गुंतवणूक कुठे करावी? थोडक्यात मानसाने पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात त्यांना जर तुम्ही उसणे पैसे दिले तर ते पैसे तुम्हाला परत तुमच्या गरजेच्या वेळी मिळतीलच याची कोणतीही खात्री नसते, त्यामुळे अशा लोकांना पैसे देताना हजार वेळा विचार करा, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

फसवणूक करणारे लोक – चाणक्य म्हणतात समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक हे अतिशय प्रामाणिक असतात, मात्र समाजात असे  देखील काही लोक असतात, जे तुमची फसवणूक करू शकतात, असे लोक तुम्हाला ओळखता आले पाहिजे, जर तुम्ही अशा लोकांना पैसे दिले तर हे लोक तुमची फसवणूक करतील, तुम्हाला तुमचे पैसे कधीही परत मिळणार नाहीत, त्यामुळे संकटाच्या काळात तुम्ही अडचणीत याला त्यामुळे अशा लोकांना कधीही पैसे उसणे देऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

मूर्ख लोक – चाणक्य म्हणतात जे लोक मूर्ख असतात त्यांना पैशांचा वापर कसा करायचा? याबद्दल माहिती नसते, त्यामुळे जर अशा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे उसणे घेतले तर तो त्या पैशांची उधळपट्टीच करणार आहे, तो तुमचे पैसे खर्च करून टाकेल, त्यानंतर तो तुम्हाला तुमचे पैसे परत कधीही देणार नाही, त्यामुळे अशा लोकांना पैसे देऊ नये.

लालची लोक – चाणक्य म्हणतात या लोकांच्या हातून पैसा कधीच सुटत नाही. भलेही तुम्ही त्या व्यक्तीला उसणे पैसे दिले असतील, परंतु तो तुमचेच पैसे तुम्हाला परत करण्यासाठी टाळाटाळ करेल, त्यामुळे अशा लोकांना कधीही उसणे पैसे देऊ नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO
  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in