• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या पाच ठिकाणी शांत बसणंच हिताचं, अन्यथा मृत्यूशी पडू शकते गाठ

February 2, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. माणसानं आपल्या आयुष्यात कसं वागावं, याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजच्या काळातही उपयोगी ठरतात, आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. चाणक्य म्हणतात अनेकदा व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्यामुळे तो कोलमडून पडतो, काय करावं? हे त्याला काही समजत नाही. अशा स्थितीमध्ये व्यक्ती प्रचंड अस्वस्थ असतो. त्यामुळे या काळात अनेकदा तो घाईघाईने निर्णय घेतो, असे निर्णय अनेकदा चुकतात आणि त्या व्यक्तीला मोठी किंमत मोजावी लागते, त्यामुळे जेव्हाही तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतील, तेव्हा घाबरून जाऊ नका, नीट शांतपणे सर्व परिस्थितीचा विचार करा आणि त्यानंतरच आपल्यासाठी काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? हे ठरवा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या, तुम्हाला यश नक्की मिळणार, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

रागीट व्यक्ती –चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा सामना हा एखाद्या रागीट व्यक्तीशी होतो, तेव्हा अशावेळी तुम्ही शांत रहा, जर तुम्ही शांत राहाल तर समोरच्या वक्तीचा देखील राग शांत होईल, आणि पुढचे सर्व अनर्थ टळतील.

प्रतिकूल परिस्थिती – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रतिकूल काळ सुरू असतो, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये न डगमगता शांतपणे सर्व परिस्थितीचं अवलोक करा आणि नंतर निर्णय घ्या, घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही संकटात पडू शकता.

आजारपण – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही आजारी असता, तेव्हा जास्त श्रम करू नका, त्यामुळे तुमची तब्येत आणखी बिघडून प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे आधी आजारातून बरे व्हा आणि मगच काम सुरू करा, तोपर्यंत शांत बसा.

आपल्यापेक्षा जास्त ताकद असलेला व्यक्ती – चाणक्य म्हणतात जेव्हा समोरचा व्यक्ती हा आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असतो, तेव्हा अशा ठिकाणी शांत राहिलेलंच हिताचं असतं.

बलवान शत्रू – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा शत्रू हा बलवान असतो, तेव्हा त्याला थेट भिडणं हा मूर्खपणा असतो, त्यामुळे शांततेमध्ये सर्व नियोजन करून मगच कोणताही निर्णय घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in